आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nana Patole's Name In The Lead For Congress State President, Likely To Be Announced Soon By Congress; Search For Assembly Speaker Begins

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडीसाठी हालचाली:प्रदेशाध्यक्षपदासाठी पटोलेंचे नाव आघाडीवर, काँग्रेसकडून लवकरच घोषणा होण्याची शक्यता; विधानसभा अध्यक्षाचा शोध सुरू

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरेश वरपुडकर, संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण या तिघांची नावे विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचे नाव जवळपास निश्चित केले असल्याचे सांगितले जाते.

नाना पटोले हे राज्यातील एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. याशिवाय, ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. या दोन गोष्टी त्यांच्यासाठी जमेची बाब ठरल्याचे सांगितले जात आहे. विधिमंडळ नेता, मुंबई अध्यक्ष ही दोन्ही पदे मराठा नेत्याकडे आहेत. त्यामुळे जातीचा समतोल राहावा यासाठी प्रदेशाध्यक्ष बिगर मराठा हवा अशी पक्षात मागणी होती. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला विदर्भात यश मिळाल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी हायकमांडची भेट घेत विदर्भासाठी दावेदारी केली.

विधानसभा अध्यक्ष कोण?

परभणीचे सुरेश वरपुडकर, संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण अशा तिघांची नावे विधानसभा अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा पृथ्वीराज चव्हाण यांना विरोध आहे, हे उल्लेखनीय.