आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमटा:सर्वात जास्त जागा ज्यांना मिळतील त्यांचा मुख्यमंत्री होईल; नाना पटोले यांचा जयंत पाटलांना चिमटा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जयंत पाटील हे त्यांच्या पक्षाचे बोलतात, महाविकास आघाडीचे बोलत नाहीत, प्रत्येकाला स्वप्न पाहण्याचा अधिकार आहे. ते त्यांनी पहावे, शेवटी ज्यांच्या जागा अधिक त्यांचा मुख्यमंत्री होतो. त्याचा कौल जनता देते. त्यामुळे त्यावर अधिक बोलणे योग्य नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यभरात गारपीट, आणि अवकाळीमुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना, मुख्यमंत्री रुसून गावाला जातात, तर उपमुख्यमंत्री मॉरेशिसला जातात. असे म्हणतानाच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना फसवी आहे. त्याचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नाही.

राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीला सर्वात जास्त ठिकाणी यश मिळाले आहे. महाविकास आघाडीतही राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा जास्त कृषी उत्पन्न बाजार समितींवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यानंतर जयंत पाटील यांनी राज्यात पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होईल असे वक्तव्य केल आहे. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या तोंडात साखर पडो, असे म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

जयंत पाटील काय म्हणाले?

जयंत पाटील म्हणाले होते, महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होणार, हे आता सगळ्यांनी मान्य केले आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी भविष्यात पुढे येईल. जोपर्यंत आमचा नंबर येत नाही, तोपर्यंत याची चर्चा करण्यात अर्थ नाही. नंबर आल्यावर यावर एकमताने चर्चा होईल, पण आमच्यात कोणताही वाद नाही. तत्पूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यात ठिकठिकाणी आजित पवारांच्या नावाने फलक लागले होते.

अजित पवारांचे वक्तव्य काय?

अजित पवार म्हणाले, जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, त्यांचे म्हणणे खरे ठरो. सरकारला दहा महिने पूर्ण झालेत, पण जनतेच्या मनात या सरकारबद्दल समाधान असल्याचे दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदावरुन केलेल्या विधानांमुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना नाव न घेता टोला लगावला आहे. ते मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.