आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:फोन टॅपिंगप्रकरणी नाना पटोलेंचा जबाब; या संपूर्ण प्रकरणामागचा खरा सूत्रधार कोण ?

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यात आले होते. गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे हे फोन टॅपिंग केले होते. हे फोन टॅपिंग केवळ राजकीय द्वेषापोटी करण्यात आले होते. या संपूर्ण प्रकरणामागचा खरा सूत्रधार कोण हे उघड झाले पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

पटोले म्हणाले, फोन टॅपिंगप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी शनिवारी माझा जबाब नोंदवला. माझे फोन रेकॉर्डिंग त्यांनी ऐकवले, तो आवाज माझाच होता. शेतकरी आंदोलनविषयक माझी भूमिका या रेकॉर्डिंगमध्ये होती. कोर्टात चार्जशीटमध्ये याची नोंद येईल. हे फोन टॅपिंग करताना आपले नाव अमजद खान ठेवून ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचे कारण दिले होते.

राजकीय जीवनात कुठेही चुकीचे काम केले नाही
माझ्याकडे एकच फोन नंबर असून राजकीय व सामाजिक जीवनात वावरताना मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारणच नाही, ‘कर नाही तर डर कशाला?’. चुकीचे कारण देत दोनदा फोन टॅपिंगची परवानगी घेतली गेली. यामागचा खरा सूत्रधार कोण हे उघड झाले पाहिजे आणि चौकशीतून ते बाहेर येईल, असा मला विश्वास असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...