आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविकासासाठी देशाला काँग्रेसची गरज आहे अशी धारणा जनतेमध्ये वाढत चालली आहे. असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. एक व्हिडिओ टविट करत त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. तर यासाबेतच अयोध्या दौरा करणार असल्याचेही त्यांनी आज सांगितले आहे.
अयोध्येच्या महतांचे पटोलेंना निमंत्रण
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. अयोध्येतील दशरथ गादीचे प्रमुख महंत बृजमोहन दास यांनी आज प्रदेश काँग्रेसचे मुख्यालयात जात प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला भेट देण्याचे निमंत्रण दिले आहे, या निमंत्रणाचा स्वीकार करत मी आयोध्येला येणार असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
राजकीय नेत्यांची अयोध्या दौऱ्याची स्पर्धा?
राज्यातील अनेक नेत्याचे अयोध्या दौरे चर्चेत असताना आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील अयोध्येत जात प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहे. आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंच्या दौऱ्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. असली आ रहे है नकली से सावधान असे बॅनर देखील आयोध्येत लागले आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठी, मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे गाड्यांचेही बुकींग केले आहे. तर मनसेकडून अयोध्या दौऱ्यासाठी मोठा फौजफाटा घेऊन जाणार आहेत. राज यांच्या दौऱ्यानंतर 5 दिवसांनी म्हणजेच 10 जून रोजी शिवसेना नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जात आहेत. त्यामुळे, राजकीय नेत्यांमध्ये अयोध्या दौरा आणि प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी स्पर्धाच लागल्याची चर्चा सुरू आहे.
आमदार रोहित पवारांचा अयोध्या दौरा
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी कुटुंबीयांसमवेत अयोध्येत जात प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले आहे. या दौऱ्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर, आता राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.