आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यात झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अपघातातील जखमींवर शासकीय रुग्णालयात आवश्यक उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
नांदेड जिल्ह्यामधील मुदखेड तालुक्यात मुगट-इंजळी रस्त्यावर रिक्षा व ट्रकच्या भीषण अपघतात ५ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर शासकीय मुदखेड व विष्णुपूरी येथील शंकरराव चव्हाण आरोग्य संकुल नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुदखेड तालुक्यातील मुगट शिवारात असलेल्या इस्सार पेट्रोल पंपाजवळ वळण रस्त्यावर गुरुवारी (३० मार्च) सकाळी दहा वाजेच्या सुमारास नांदेडहून मुदखेडकडे येत असलेल्या मालवाहू ट्रकने मुदखेडहून नांदेडकडे कामासाठी मजुरांना घेऊन जाणाऱ्या प्रवासी ऑटोला (एमएच २६ टी ७६९७) धडक दिली. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दहा जण जखमी झाले. एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर दहा जण जखमी झाले आहेत.
मृतांत सरोज भोई (४०, रा. मेहकर, जि. बुलडाणा), गणी कल्याण भोई (२४, रा. गेवराई, जि.बीड) व त्यांचा मुलगा जोयल कल्याण भोई (सात महिने), पुंडलिक किशन कोल्हटकर (८६, रा. सावरगावमाळ, ता. भोकर, जि. नांदेड) व विद्या हाटकर (३५, रा. इजळी, ता. मुदखेड) यांचा समावेश आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.