आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाने निधन:नांदेडमधील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन, मुंबईत सुरू होते उपचार

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रावसाहेब अंतापूरकर यांचा कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता.

नांदेडमधील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या ते 55 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंतापूरकर यांच्यावर मुंबई रुग्णालयात उपचार सुरू होते. येथेच रात्री त्यांची प्राणज्योत मालावली.

रावसाहेब अंतापूरकर यांचा कोरोना रिपोर्ट काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांच्यावर नांदेडमधील रुग्णालयातच उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आले. मुंबई रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

अशोक चव्हाण यांनी अंतापूरकर यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. चव्हाणांचे त्यांच्यासोबत निकटचे संबंध होते. अंतापूरकर हे त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. चव्हाण यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत म्हटले की, 'माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई हॉस्पिटल येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबीयांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना', असे ट्वीट चव्हाण यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...