आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nanded | Drugs | Raid On Three Drug Factories In Nanded; 111 Kg Of Opium Was Seized And Raids Were Carried Out In Several Districts Of Madhya Pradesh

एनसीबीची कारवाई:नांदेडात तीन ड्रग्ज कारखान्यांवर धाड; 111 किलो अफूची बोंडे केली जप्त, मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांतही छापेमारी

वृत्तसंस्था | मुंबई, नांदेड4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनसीबीने धडाकेबाज कारवाई करत नांदेडमधील तीन ड्रग्ज कारखाने उद्ध्वस्त केले. या छाप्यात १११ किलो अफूची बोंडे, दीड किलो अफू व १.५५ लाख रोकड जप्त केली. शिवाय हेरॉइन तयार करणारे २ ग्राइंडिंग मशीन, वजनकाटा व नोटा मोजण्याचे मशीनही एनसीबी पथकाने हस्तगत केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

राज्यात मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या ड्रग्ज तस्करीविरोधात अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोने (एनसीबी) मोहीम उघडली आहे. नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यात मांजरम येथे काही दिवसांंपूर्वी एनसीबीने ११०० किलो गांजा जप्त केला होता. त्यानंतर तपास सुरू असताना एनसीबीला शहरातच ड्रग्ज निर्मिती करणारे तीन कारखाने असल्याची टिप खबऱ्यांनी दिली होती. त्यानुसार एनसीबीने माळटेकडीतील कामठा भागात व्यापारी संकुलावर छापा मारला.

त्या वेळी तिथे तीन छुपे कारखाने सुरू असल्याचे सापडले. या तीन कारखान्यांमध्ये १११ किलो अफूची बोंडे, दीड किलो अफू होती. अफूची बोंडे ही हेरॉइन या अमली पदार्थ तयार करण्याठी वापरली जातात, अशी माहिती एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मंगळवारी दिली.

अफूच्या बोंडापासून हेरॉइन निर्मिती : अफूच्या बोंडापासून हेरॉइन या अमली पदार्थाचे उत्पादन केले जाते. नांदेडमध्ये तीन कारखान्यांमध्ये हा गोरखधंदा बिनबोभाट सुरू होता. हा तयार माल मध्य प्रदेशातही जात असल्याचा संशय असून त्या राज्यातही एनसीबीने धाडी सुरू केल्या आहेत.

दिव्य मराठी स्टिंगने केला होता राज्यभर पसरलेल्या गोरखधंद्याचा पर्दाफाश

आर्यन केसच्या निमित्ताने मुंबई हे चर्चेचे केंद्र बनले असताना उत्तर महाराष्ट्रापासून मराठवाड्यातील गावांमध्ये पसरलेल्या अमली पदार्थांच्या बजबजपुरीचा ‘दिव्य मराठी’ने पर्दाफाश केला. एनसीबीने नांदेडला पकडलेल्या गांजाचे ‘एरंडोल कनेक्शन’, जुन्या नाशिकममधील ‘हरा माल, सफेद पावडर’, कोल्हापूरला एनसीबीने उद्ध्वस्त केलेला राजहंसचा एमडी निर्मितीचा छुपा कारखाना आणि औरंगाबादच्या ‘बावन्न दरवाजे का माल’ आदी गोरखधंदा ‘खुलेआम मालामाल’या वृत्त मालिकेद्वारे दिव्य मराठीने उघड केला.

बातम्या आणखी आहेत...