आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिपी विमानतळाचे श्रेय माझेच:विमानतळ उद्घाटनावरून नाराजीनाट्य, ठाकरे-ज्योतिरादित्य यांच्यापेक्षा मी ज्येष्ठ, तरीही डावलले : राणे

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पत्रिकेवर तिसऱ्या क्रमांकावर नाव टाकल्याने नाराज ​​​​​​​

रत्नागिरी जिल्ह्यात उभ्या राहिलेल्या चिपी या कोकणातील पहिल्या विमानतळाचे सर्व श्रेय भाजप व माझे एकट्याचे आहे, असा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. चिपी विमानतळाचे उद््घाटन शनिवारी होत आहे. यानिमित्ताने विमानतळाच्या श्रेयाचा वाद चांगलाच पेटला आहे.

राजकारणात आणि राजशिष्टाचारात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना मीच ज्येष्ठ आहे तरीही मला डावलले आहे. यावरून शिवसेनेची संकुचित वृत्ती दिसते, असा दावा राणे यांनी केला. विमानतळ उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला भाजप प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत राणे यांनी चिपी विमानतळासाठी कोणी मेहनत घेतली आणि श्रेय कोण घेत आहे त्याबाबत भाष्य केले.राणे म्हणाले, आमदार म्हणून, मंत्री म्हणून, मुख्यमंत्री म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास मीच केला. त्यात शिवसेनेचा काही संबंध नाही. आता लोकार्पण होत असलेल्या चिपी विमानतळाचे काम मीच केले. मात्र, विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या पत्रिकेत माझे नाव तिसऱ्या क्रमांकावर बारीक टाकण्यात आले. नावाची शाईसुद्धा फाटली आहे, असा आरोप राणे यांनी केला.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आपण केल्याचे राणे म्हणाले. मी १९९० मध्ये आमदार झालो, नंतर मंत्री आणि मुख्यमंत्रीही झालो. सिंधुदुर्गात रस्ते नव्हते, शिक्षणाची सोय नव्हती. रुग्णालय नव्हते. पाण्याचाही मोठा प्रश्न होता. मुख्यमंत्री असताना मी ११० कोटी खर्च करून तालुक्या-तालुक्यांना जोडणारे २८ पूल बांधल्याचा दावा राणे यांनी केला. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून मीच घोषित करायला लावला. त्यादृष्टीने सर्व नियोजन आपण केले. आता जी चिल्लर बाजारात फिरतेय तेव्हा ती कुठे होती, असा सवालही त्यांनी शिवसेनेला केला.

मुख्यमंत्र्यांशी आपले वैर नाही
चिपी विमानतळासाठी अगदी सुरुवातीपासूनच मी प्रयत्न केले. यात शिवसेनेचा काहीही संबंध नाही. लोकार्पण कार्यक्रमात मी हे सांगणार आहे. मुख्यमंत्री उद्घाटनाला येत आहेत, त्यांच्याशी वैर नाही. पण हे जे आता मिरवत आहेत त्यांनी मिरवू नये, असा टोलाही राणे यांनी खासदार विनायक राऊत, सुभाष देसाई व अनिल परब यांचे नाव न घेता लगावला.

सिंधुदुर्गात विकासकामे सुरू
सिंधुदुर्गात‍ विकासकामे सुरू झाली. कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्या आल्या की लगेच अडवल्या जायच्या. त्यांच्याकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत:साठी कार घेतल्या, त्याचे फोटोही आहेत माझ्याकडे. विकासकामातदेखील यांनी पैसे खाल्ले, असा आरोपही नारायण राणे यांनी केला. त्यामुळे आता या मुद्यावर शिवसेनेकडून काय उत्तर मिळते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...