आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..तर उद्धव, रश्मी ठाकरे राऊतांना चपलेने मारतील:नारायण राणेंचा हल्लाबोल; म्हणाले - राऊत मला काय सांगायचे हे ठाकरेंना भेटून सांगेन

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना संपवण्याची सुपारी संजय राऊतने घेतलेली आहे. आत्ताच्या राजकारणातला संजय राऊत जोकर आहे, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. तसेच तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार आहे म्हणत राऊतांचे चॅलेंज स्वीकारले आहे.

संजय राऊत यांना आपण पुन्हा जेलवारी घडवणार, असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला होता. तर नारायण राणेंनी केलेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी देखील तिखट शब्दांमध्ये 'माझ्या नादाला लागू नका. राजवस्त्र उतरवून या,', असे म्हणत पलटवार केला होता. आज पुन्हा एकदा नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीका केली आहे.

शिवसेना संपवल्याचा त्याला आनंद

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, शिवसेनेच्या 19 जून 1966 पासून पहिल्या 40 वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलेली नाही. ती संजय राऊतने घेतलेली आहे. आज त्याला शिवसेना संपवल्याचा आनंद होत आहे. 56 आमदार होते आता 12 पण राहिलेले नाही. संजय राऊतचे एकतरी विकासात्मक काम सांगा. संपादक म्हणून त्यांनी लिहिलेला एकतरी बौद्धीक लेख दाखवा.

जिथे बोलावशील तिथे येईल

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, मला 1990 पासून संरक्षण देण्यात आलेले आहे. ते मी मागितलेले नाही. त्यावेळी संजय राऊत शिवसेनेत नव्हता. त्यामुळे त्याला हे माहित नाही. त्यावेळी तो लोकप्रभामध्ये शिवसेनेविरोधात लेख लिहित असे. मात्र आज मी सांगतो, संजय राऊत तु जिथे बोलावशील तिथे यायला मी तयार आहे. आज मी माझे संरक्षण सोडायला तयार आहे.

शिव्या देण्यापलीकडे काही काम नाही

नारायण राणे म्हणाले, जनतेला सुखी समाधानी करण्यासाठी आमच सरकार राज्यात काम करत आहे. हे काय लोकांच्या हिताच बोलतात. सकाळी उठल्यापासून याला एकच काम टीका फक्त टीका. अडीच वर्षात त्यांनी राज्याचा काय विकास केला. राज्याचा किती जीडीपी वाढवला, किती रोजगार उपलब्ध करुन दिला हे सांगावे. आत्ताच्या राजकारणातला संजय राऊत जोकर आहे. लेखातून शिव्या देण्यापलिकडे काही काम तो करत नाही.

मातोश्रीला सुरुंग लावणारा विष

नारायण राणे म्हणाले, एक दिवस मी उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे. मी खासदार असताना संसदेत संजय राऊत माझ्या बाजूला बसून उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल काय काय बोलायचा ते मी त्यांना सांगणार आहे. त्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या ऐकून उद्धव आणि रश्मी ठाकरे संजय राऊतला चपलेने मारले नाहीतर मला सांगा. संजय राऊत मातोश्रीला सुरुंग लावणारा विष असल्याची टीका राणे यांनी केली.

नारायण राणे यांचा घणाघात:पुन्हा तुरुंगाचा दरवाजा दाखवणार

संजय राऊत यांना आपण पुन्हा जेलवारी घडवणार, असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तर नारायण राणेंनी केलेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी देखील तिखट शब्दांमध्ये 'माझ्या नादाला लागू नका. झाकली मुठ सव्वा लाखाची', असे म्हणत पलटवार केलाय. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...