आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरेंची शिवसेना २०१९ पर्यंत भाजपसोबत नांदली. त्यानंतरत्यांनी स्वतः नैतिकता सोडली व काॅंग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. शरद पवारांचा हात पकडून ते सत्तेत बसले. आता त्यांनी नैतिकतेवर बोलू नये. ते घरात आहेत घरातच राहावे असा जोरदार प्रहार केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी केला. ते आज माध्यमांसमोर बोलत होते.
राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल काल सर्वोेच्च न्यायालयाने दिला. त्या धर्तीवर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असे कोर्टाने म्हटले. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी यावर लवकर निर्णय घ्याव आणि कालमर्यादा निर्णयाला असावी अशी ठाकरे गटाची भूमिका आहे. यावर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फटकारले.
काय म्हणाले राणे?
नारायण राणे म्हणाले, विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादा असते का? अभ्यास करावा. त्यांना (उद्धव ठाकरेंना) कायदे माहित नाही. सुप्रीम कोर्टात जावे. ठाकरेंनी राजीनामा देऊन स्वतः मुर्खपणा केला काल कबुल केले की, माझे चुकले. ते शिंदे-फडणवीसांना राजीनामा द्या असे सांगत आहेत त्यांना काय अधिकार आहे?
नैतिकतेवर ठाकरेंनी बोलू नये
राणे म्हणाले, नैतिकतेची बाब विचारात घेतल्यास २०१९ पर्यंत ठाकरे भाजपसोबत नांदले. त्यानंतर निवडणुका झाल्या. नंतर त्यांनी स्वतः नैतिकता सोडली व काॅंग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली. शरद पवारांचा हात पकडून सत्तेत बसले. आता त्यांनी नैतिकतेवर बोलू नये. ते घरात आहेत घरातच राहावे.
पवारांनी काहीच ठेवले नाही
राणे म्हणाले, शरद पवारांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकात ठाकरेंबद्दल लिहुन ठेवले. त्यामुळे त्यांनी ठाकरेंचे काहीच ठेवलेच नाही. तरीही ठाकरे पवारांसोबत जाणार असे म्हणतात. त्यांच्यात आता काहीच ताकद राहीली नाही.
अशा गोष्टी कुणी उघड करत नाही
राणे यांनी अजित पवारांबद्दल वक्तव्य केले. ते म्हणाले, अजित पवार भाजपच्या संपर्कात होते की, नाही हे मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारेल. राजकारणातील अशा गोष्टी कुणी उघड करीत नाही. नाॅट रिचेबल लोकेशन सांगून ते गेले होते का? पश्चिम महाराष्ट्राला बारसूचा काय संबंध आहे? साताऱ्याचा एकही प्रश्न त्यांनी शिल्लक ठेवला नाही. त्यामुळे आता कोकणाकडे वळत आहेत आणि बारसूत विरोध करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.