आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नारायण राणे यांनी चक्क हात 'जोडत जोऊद्या' असे उत्तर दिले. ''हा कहर आहे. मातोश्रीतून बाहेर ते येत नाही. विधीमंडळात न येता ते पंतप्रधान काय बनणार. ही या पदाची चेष्ठा आहे. हात वर केला की, खाली आणायला तीन मिनिटे लागतात असा टोला लगावत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचा खास शैलीत समाचार घेतला. ते आज माध्यमांशी बोलत होते.
स्वतःची जीभ सांभाळा
नारायण राणे म्हणाले, ''उद्धव ठाकरेंनी स्वतःची जीभ सांभाळावी. ते असे फिरत राहीले तर तीही जागेवर राहणार नाही. फिरवा फिरवी सुरूय. संजय राऊतांनी आता कसे फिरवले मी असे बोललोच नाही म्हणतात. चाळीस आमदार घेवून गेले पण उद्धव ठाकरेंनी का नाही थांबवले. का जीभ नाही पकडली''
40 आमदार गेले तेव्हा काय केले?
नारायण राणे म्हणाले, ''चाळीस आमदार जाताना उघड्या डोळ्यांनी पाहू शकत होते का. मी असे पर्यंत कुणाची शिवसेनेतून बाहेर पडण्याची हिंमत नव्हती. शिवसेना विषय संपला, दुकान बंद झाले आता महाराष्ट्रातून लवकरच लाॅकआऊट होईल.''
मी काम करतोय मंत्री आहे
नारायण राणे म्हणाले, ''मी काम करतोय, रोजगार निर्माण करतोय. माझ्याकडे मंत्रिपद आहे. लाखोंचा कोटींचा फंड देतोय. देशाचा जीडीपी वाढवत आहे. ते आमचे कामच आहे. ते बोलतात त्यावर आम्ही काय बोलणार? आम्ही बोलत नाही पण विचारले जाते म्हणून सांगतो. महाराष्ट्राला काही देऊ शकतील असे व्यक्ती आघाडीत नाही.''
राणेंनी जोडले हात!
उद्धव ठाकरे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात या संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नारायण राणे यांनी चक्क हात 'जोडत जोऊद्या' असे उत्तर दिले. पुढे ते म्हणाले की, ''हा कहर आहे, विधीमंडळात न येता मातोश्रीतून बाहेर आले नाही व पंतप्रधान बनणार काय जेवण आहे का. ही या पदाची चेष्ठा आहे. हात वर केला की, खाली आणायला तीन मिनिटे लागतात. या महाराष्ट्रात खोके कुणी जमवले ते माझ्या आणि एकनाथ शिंदेंना विचारा.''
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.