आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Narayan Rane Had Come To Seek Blessings, Angry Shiv Sainiks Purified Balasaheb's Memorial With Cow Urine; Case Registered Against 7 Organizers; News And Live Updates

जन आशीर्वाद यात्रेवर वाद:मुंबई पोलिसांनी 19 जणांवर केला गुन्हा दाखल; भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेत कोरोना नियमांचे उल्लंघन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते नारायण राणे

राज्यभरात भाजपच्यावतीने जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनीदेखील काल मुंबई विमानतळावरुन आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. दरम्यान, मुंबईत कोरोना नियमांचे उल्लघंन करत जन आशीर्वाद यात्रा काढल्याप्रकरणी 19 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये जास्तीत जास्त आयोजकांचा समावेश आहे. यात्रेदरम्यान, कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टेन्सिंगचा उल्लघंन केला आहे. विशेष म्हणजे अनेक कार्यकर्त्यांनी मास्कदेखील घातले नव्हते. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याची सांगण्यात येत आहे.

आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते नारायण राणे
केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई विमानतळावरुन सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आशीर्वाद घेतला असून फूल वाहिले. यानंतर शिवसेना नेत्यांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळाला. याप्रसंगी शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार राऊत यांनी नारायण राणे यांच्या स्मृतीस्थळावर जाण्याला विरोध दर्शवला.

स्मृतीस्थळावर जाऊन नारायण राणे यांनी घेतले होते दर्शन.
स्मृतीस्थळावर जाऊन नारायण राणे यांनी घेतले होते दर्शन.

शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचे केले शुद्धीकरण
नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर शिवसैनिकांनी यांच्या स्मृतीस्थळावर गोमुत्र शिंपडून, दुधाचा अभिषेक शिवसैनिकांनी घातला. दुपारी नारायण राणे यांनी स्मृतीस्थळावर आले होते. त्यामुळे हा परिसर अशुद्ध झाला असल्याचे शिवसैनिक म्हणाले आहेत. त्यामुळे आता राज्यात नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी शुद्धीकरण केले.

नारायण राणे निघून गेल्यानंतर स्मृतीस्थळाचे शुद्धीकरन करतात शिवसैनिक...
नारायण राणे निघून गेल्यानंतर स्मृतीस्थळाचे शुद्धीकरन करतात शिवसैनिक...
बातम्या आणखी आहेत...