आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Narayan Rane Predicts That The Maharashtra Government Will Collapse By September October Due To Lack Of Consensus Among The Three Parties

राजकारण:संजय राऊत…कधी येता कर्नाटकला?, मी मोकळाच आहे; नारायण राणेंचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

सिंधुदुर्गएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीन पक्षात एकमत नसल्याने सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, नारायण राणे यांचा भाकित

कर्नाटक सरकारने बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला होता. यावरून आता राजकारण सुरू आहे. वेळ पडल्यास विरोधीपक्षाच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करु, पण ते यायला तयार आहेत का? असा सवाल राऊतांनी विचारला होता. याला आता भाजप नेते नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकला सांगा? अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना उत्तर दिले आहे.

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी कर्नाटकमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय चालू आहे, असा दावाही नारायण राणे यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात खूप कामे आहेत. मी मोकळा आहे, कधी येता कर्नाटकाला सांगा? असा सवाल राणेंनी विचारला. तसेच तीन पक्षात एकमत नसल्याने हे सरकार चालणार नाही. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळेल, असे भाकित नारायण राणे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले.

बातम्या आणखी आहेत...