आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात कोकणाला काय दिले?:नारायण राणे; म्हणाले - एकतरी प्रकल्प दिला का? आलात दोनदा मासे खायला

सिंधुदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात कोकणाला काय दिले? कोकणाला एकतरी प्रकल्प दिला का? आलात दोनदा मासे खायला असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हणत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

नारायण राणे म्हणाले?

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेकडून कोकणात प्रकल्प येताच त्याला विरोध केला जात होता. एंरॉन प्रकल्प आला. एंरॉनमध्ये काम कोणी घेतली, गाड्या कोणाच्या होत्या. कंत्राटदार कोण होते. त्यात राजन साळवी कंत्राटदार होते, असा आरोपही यावेळी नारायण राणे यांनी केला आहे.

बाळासाहेबांनंतर शिवसेना फक्त टक्केवारी करणारी

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, बाळासाहेबांनंतर शिवसेना फक्त टक्केवारी करणारी आहे, नाणारच्या गावात किती जागा घेऊन ठेवल्या. आमची कोणत्या प्रकल्पात कोणती जागा आहे का सांगा. कोकणी माणसानं घाम गाळून शिवसेनेची सत्ता मुंबईत आणली आणि यांनी 25 वर्षे मुंबई महापालिका लुटली, संसार उभारले, देश-परदेशात गुंतवणूक केली, मात्र कोकणी माणसांकडे कुणी पाहिले नाही, असा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.

फडणवीसांची ठाकरेंवर टीका

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंधुदुर्ग जात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. ते म्हणाले की, रिफायनरी प्रकल्प आला तर आंबे येणार नाही, शिवाय मच्छिमारांना सांगितले की मच्छिमारी होणार नाही, असे सांगत लोकांची दिशाभूल केली असा आरोप फडणवीसांनी ठाकरेंवर केला आहे. रिफायनरीविरोधात खोटा प्रचार करून कोकणाचे नुकसान केले.शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणातील आंगणेवाडी येथे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

बातम्या आणखी आहेत...