आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सुसाइड केस:सुशांत प्रकणाच्या तपासात शिवसेना नेता संजय राऊत अडथळे निर्माण करत आहेत, तर अभिनेता आणि दिशा सालियान प्रकरणाचा संबंध - नारायण राणे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 जून रोजी अभिनेता सुशांतसिंग राजपूत याचा मृतदेह वांद्रेच्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेला आढळला होता

अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेच्या विधानावरून शंका निर्माण होत आहे. मुंबई पोलिस या प्रकरणाचा तपास दबावात करत आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी सुशांतची हत्या झाली असल्याचा पुनरोच्चार केला आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना राणे म्हणाले की, 'सुशांतला न्याय मिळावा यासाठी सीबीआय तपास होणे गरजेचे आहे. सुशांत आणि दिशा सालियान या दोन्ही प्रकरणाचा संबंध आहे.' तसेच ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात केस गेल्याने अपेक्षा वाढल्या आहेत.

संजय राऊत या प्रकरणी अडथळे आणत आहेत
प्रसार माध्यमांशी बोलताना राणे म्हणाले की, 'या प्रकरणात शिवसेना नेता संजय राऊत अडथळे आणत आहेत. ते असे का करत आहेत? ते असे वागत असल्याने मला संशय येत आहे की, त्यांचाही या प्रकरणाशी काही संबंध आहे. तपासासाठी आलेल्या बिहार पोलिसांच्या एसपीला क्वारंटाइन करण्याची काहीच गजर नव्हती. ते मुंबईत आल्याबरोबर त्यांना अटक का करण्यात आली? या प्रकरणाची कोणतीही माहिती बाहेर जाऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी हा बंदोबस्त केला होता.'

आदित्य ठाकरेंचा या प्रकरणाशी काही संबंध नाही मग ते का बोलत आहेत
राज्यातील मंत्र्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, मी आदित्य ठाकरेंचे नाव घेतले नाही. जर त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर ते का बोलत आहेत. मुंबई पोलिस हे दबावात तपास करत आहेत. सीबीआय तपासणी केल्याने सत्य समोर येईल.

यापूर्वी केला होता सुशांतचा खून केल्याचा आरोप
यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली नाही, त्याची हत्या केली गेली. महाराष्ट्र सरकार या प्रकरणात एखाद्याला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे. 13 जूनच्या रात्री सुशांतच्या घरी पार्टी असल्याचा दावा त्यांनी केला होता. या पार्टीमध्ये महाराष्ट्राचे एक मंत्री उपस्थित होते. पार्टी संपल्यानंतर मंत्री घरी गेले आणि नंतर सकाळी सुशांतचा मृतदेह सापडला.

बातम्या आणखी आहेत...