आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:ठाकरेंवरील आक्षेपार्ह टिपण्णीबाबतचा नारायण राणेंवरील गुन्हा अखेर रद्द, अलिबाग न्यायालयाचा निकाल

अलिबाग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी केल्याच्या प्रकरणात नारायण राणे यांना अलिबाग न्यायालयाने शनिवारी मोठा दिलासा दिला. या प्रकरणातील नारायण राणे यांच्याविरोधातील गुन्हा अखेर रद्द करण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिपण्णी केल्याच्या प्रकरणात राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी त्यांना अटकही करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर जामिनावर त्यांची सूटकाही झाली होती. पण, शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात झालेले सत्तांतर आणि जवळपास नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर नारायण राणे यांच्याविरोधातील गुन्हा रद्द करण्यात आला आहे.

काय म्हणाले होते राणे?

महाविकास आघाडीचे सरकार असताना नारायण राणे महाड येथील पत्रकार परिषदेत म्हणाले होते की, "मी असतो तर त्यांच्या कानशिलातच वाजवली असती." त्यांच्या विधानाने राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. राणेंविरोधात राज्यभरात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच पुणे, नाशिक, महाड, धुळे, अहमदनगर आणि जळगावमधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

दरम्यान, या प्रकरणात राज्यातून तक्रारी दाखल होऊ लागलयाने नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. समाजात तेढ निर्माण करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यावेळी नारायण राणे यांच्याकडून सांगण्यात आले होते.