आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणे-उद्धव यांच्यातील वाद जुना:राणेंच्या नजरेत शिवसेनेतून बाहेर पडण्यास उद्धव ठाकरे जबाबदार, बाळासाहेब गेल्यानंतर राणे पक्ष फोडतील असा संशय उद्धव ठाकरेंना होता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उद्धव ठाकरेंचे मानने होते की, राणे शिवसेना फोडू शकतात

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंचे निकटवर्तीय आणि राज्यातील महत्त्वाचे नेते राणे आता ठाकरे कुटुंबाचे अर्थात महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठे विरोधक मानले जातात.

मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रकाशित झालेल्या 'झंझावात' या आत्मचरित्रात राणे यांनी नमूद केले की, उद्धव ठाकरे यांच्यामुळे त्यांना 2005 मध्ये शिवसेना सोडावी लागली. मात्र, पक्ष सोडल्यानंतरही बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना फोन करून पक्षात परत येण्यास सांगितले.

राणेंच्या म्हणण्यानुसार उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना धमकी दिली होती की जर राणेंना शिवसेनेत थांबवलं तर "मी घर सोडून जाईन". उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कसा त्रास देत असत, याविषयी राणे यांनी त्यांच्या आत्मचरित्रातही लिहिले आहे. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर राणे उघडपणे उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उभे राहण्याचे हे एक मोठे कारण आहे.

उद्धव ठाकरेंचे मानने होते की, राणे शिवसेना फोडू शकतात
बाळासाहेबांबरोबर काम करणाऱ्या एका पॉलिटिकल एक्सपर्टने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, नारायण राणेंचा दर्जा शिवसेनेत दुसऱ्या क्रमांकावर होते. ते आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत झाले होते आणि ते उद्धव यांचे चुलत भाऊ अर्थात राज ठाकरे यांच्या अगदी जवळ होते.

म्हणूनच बाळासाहेब नसतील तर राणे पक्ष फोडू शकतात आणि मोठे नुकसान करू शकतात अशी भीती उद्धव ठाकरे यांना नेहमीच होती. म्हणूनच त्यांनी हळूहळू नारायण राणे यांना बाजूला सारण्यास सुरुवात केली. 2005 पर्यंत त्यांना पक्षातून हाकलून देण्याची परिस्थिती आली होती. राणे यांनी अनेक वेळा सांगितले आहे की त्यांच्याकडे ठाकरे कुटुंबाची अनेक रहस्ये आहेत. एक्सपर्ट्सचे असे मानने आहे की उद्धव यांना माहित होते की बाळासाहेब गेल्यानंतर ते त्यांना त्रास देऊ शकतात.

त्यामुळे शिवसेनेपासून वेगळे झाले
नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील दुरावा कुटुंबवादामुळे आल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 18 वर्षांपूर्वी नारायण राणे मुख्यमंत्री होते. जवळपास नऊ महिने मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर राणे आणि बाळ ठाकरे यांचे पुत्र उद्धव यांच्यात वाद होऊ लागले.

राणे यांना शिवसेनेचे रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री म्हटले जात होते. त्यावेळी असे म्हटले जात होते की खरी लगाम उद्धव यांच्या ताब्यात होती. यानंतर भाजप-शिवसेना युती निवडणूक हरली आणि राणे विरोधी पक्षनेते झाले.

2005 मध्ये, राणे यांना पक्षातून बाळासाहेब ठाकरे यांनी काढून टाकले होते, ते म्हणाले होते नेता काढून टाकणे आणि निवडण्याचा अधिकार शिवसेनेत केवळ मलाच आहे. त्यावेळी असे बोलले जात होते की, मुलाच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांनी नारायण राणेंना पक्षातून काढून टाकले होते.

बातम्या आणखी आहेत...