आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदभार स्वीकारताच राणेंची टिप्पणी:शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री ठाकरे यांचे मन मोठे नाही, नारायण राणे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारमध्ये अनेक नव्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील चार नेत्यांना स्थान दिले असून नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल मंत्रीपदाची शपथ घेतली असून आज आपला पदभार स्विकारला आहे. यावेळी शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मन मोठे नसल्याची टीका राणे यांनी केली. ते पदभार स्विकारल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवारांनी दिल्या शुभेच्छा
दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरेवर टीका करताना त्यांनी शुभेच्छा दिल्या नसल्या तरी मला संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. दरम्यान, माझी शपथविधी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी शुभेच्छा दिली असल्याची माहिती यावेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...