आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोमवारी दुपारी राजभवनवर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेलही होते. ही राजकीय नसून सदिच्छा भेट असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. संध्याकाळी भाजप खासदार नारायण राणे यांनीही राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. राणेंनंतर कृपाशंकर सिंह यांनीही राज्यपालांची भेट घेतली.
सकाळी ११ च्या सुमारास शरद पवार हे प्रफुल पटेल यांच्यासोबत राजभवनवर पोहोचले. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. उद्धव ठाकरेंनी राजभवनावर बैठकीसाठी स्वत: येण्याऐवजी मिलिंद नार्वेकरांना पाठवल्याने राज्यपाल नाराज झाले होते. त्यानंतर लगेचच संजय राऊत यांनी त्यांची भेट घेतली होती.
संजय राऊतांची मिश्किली
: राज्यपाल-शरद पवार भेटीवर माहिती देताना संजय राऊत म्हणाले, एखादे राज्यपाल चांगले असले, मायाळू असले तर ते आमच्यासारख्यांना चहापानासाठी बोलावतात. राज्यपालांशी चर्चा होते.
सरकारला नारळ द्यावा : राणे
संध्याकाळी भाजप खासदार नारायण राणे यांनीही राज्यपालांची भेट घेतली. ते म्हणाले, कोरोनाचे संकट हाताळण्यात ठाकरे सरकार अपयशी ठरल्याचे राज्यपालांच्या कानावर घातले. या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी केली आहे.
अंतर कमी करण्याचा प्रयत्न
राज्यपाल व सरकारमध्ये सुरू असलेला सुप्त संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले, राज्यपालांनीच पवारांना चहापानासाठी बोलावले होते. कोणत्याही राजकीय विषयावर चर्चा झाली नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.