आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रिमंडळ विस्तार:नारायण राणे यांची उंची मिळालेल्या जबाबदारीपेक्षा मोठी - संजय राऊत; राणेंच्या मंत्री पदावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ...पद दिले असेल तर हे चुकीचे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिमंडाळात मोठे फेरबदल केले आहे. काल झालेल्या या मंत्रिमंडळाच्या शपथविधीत महाराष्ट्रातील भाजपच्या चार नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये मोदी सरकारने नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. याच पार्श्वभूमीवर नारायण राणे यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर शिवसेनेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

नारायण राणे हे मोठे नेते असून महाराष्ट्रात काही काळ मुख्यमंत्रीदेखील होते. त्यामुळे त्यांची उंची मिळालेल्या जबाबदारीपेक्षा मोठी असल्याचा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. मोदी सरकारने त्यांना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. कोरोनामुळे आधीच लहान उद्योगांचे कमरडे मोडले आहे त्यामुळे राणे यांनी या उद्योगांना संजीवनी देण्याचे काम करावे... त्यासाठी त्यांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.

...पद दिले असेल तर हे चुकीचे!
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोकणात शिवसेनेला फटका बसेल म्हणून जर मोदी सरकारने राणे यांना मंत्रीपद दिले असेल तर हे अतिशय चुक आहे. कारण कोणत्याही मंत्र्यांना जणतेची सेवा करण्यासाठी मंत्रीपद दिले जाते त्यामुळे त्यांनी शिवसेनेला फटका बसण्यासाठी पद दिले असेल तर हे मोदींच्या कॅबिनेटचा अपमान असून घटनेचा भंग असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...