आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंबद्दल महत्वाचे विधान:म्हणाले- ठाकरेंनी दसरा मेळाव्याला बोलावल्यास जाईल; पण ते निमंत्रण देणार नाहीत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे शिंदे गटाच्या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्यावर खुद्द नारायण राणे यांनाच विचारणा केली असता, त्यांनी आपल्या सडेतोड शैलीत उत्तर दिले. उद्धव ठाकरेंनी जर मेळाव्याला बोलावले तर त्यांच्या मेळाव्याला जाऊ, परंतु ते मला आमंत्रण देणार नाहीत असा टोलाही राणेंनी लगावला.

काय म्हणाले राणे?

आज माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले, शिंदे गटाकडून आमंत्रण आले तर सहभागी होणार, उद्धव ठाकरेंनी आमंत्रण दिले तर त्यांच्याही दसरा मेळाव्याला जाईल, पण ते आमंत्रण देणार नाही असेही राणेंनी अधोरेखीत केले.

ती बडबड कशी सहन करणार- खैरे

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर आपली प्रतिक्रीया दिली. ते म्हणाले, नारायण राणे यांनी ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मातोश्री आणि शिवसेनेबाबत जी बडबड केली. ती कुणीच सहन करु शकत नाही. ते एवढे बोलले आणि लोक चिडले, त्यातच मी त्यांच्याशी दोस्ती केली तर मला शिवसैनिक काय म्हणतील हा मुद्दा आहे. मेळाव्याला आमंत्रण दिले तर जाऊ असे त्यांना बोलण्याचे सुचतेच कसे? हाही सवाल आहे.

ठाकरे राणेंना निमंत्रण देणार नाहीतच

भाजपमध्ये केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर राणेंनी गोप्यस्फोट केला होता. त्यात उद्धव ठाकरेंनी मला मंत्रीपद मिळू नये यासाठी भाजपच्या नेत्यांकडे चंग बांधला होता. पक्षप्रवेशावरही त्यांनी मला रोखण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राणेंच्या घरावर हातोडा टाकण्याचा प्रयत्न मविआ काळात झाला. त्यानंतर राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. खालच्या पातळीवरही टीका त्यांनी केलेली आहे, ऐकेरी उल्लेखही केला. त्यामुळे ठाकरे राणेंना आमंत्रण देणार नाहीत हे स्पष्ट आहे.

राणे आणि ठाकरे वाद

  • नारायण राणेंनी चिपळूणमधील पूरपरिस्थितीचा दौरा करताना कुणीही अधिकारी उपस्थित नसल्याने राणेंचा पारा चढला होता. त्यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शरसंधान साधत "तो सीएम बीएम गेला उडत. आम्हाला कुणाचीही नावं सांगू नका. प्रांत सांगतो पालकमंत्र्यांसोबत आहे, तुम्ही सांगताय सीएमसोबत आहे. इथे कोण आहे? तुमचा एक तरी अधिकारी आहे का?" असे वक्तव्य केले होते.
  • राज्यावर येणाऱ्या संकटाला कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पायगुण ते आल्यापासून वादळ काय, पाऊस काय सर्व चालूच आहे. मुख्यमंत्री आले आणि कोरोना घेऊन आले. त्यांचे पाय बघायला हवेत, पांढऱ्या पायाचे. अशी टीका केली होती.
  • 1999 साली बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा निर्णय घेतला. मात्र, मनोहर जोशी यांना हटविण्याच्या निर्णयावर उद्धव ठाकरे हे फारसे खूश नव्हते.
  • उद्धव आणि नारायण राणेंमधील वादाला येथूनच सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. यानंतर अगदी अल्पकाळ मुख्यमंत्री पदी राहिल्यानंतर राणेंनी त्यांच्या पुस्तकातून उद्धव ठाकरेंवरील खदखद व्यक्त केली होती.
बातम्या आणखी आहेत...