आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौप्यस्फोट:नारायण राणेंचे मंत्रिपद 2 महिन्यांत जाणार : नाईक

सिंधुदुर्ग10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मंत्रिपद दोन महिन्यांत जाणार असा गौप्यस्फोट कोकणातील ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. भाजपला आता नारायण राणे यांची राजकीयदृष्टया गरज नाही, त्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे, असे कुडाळ-मालवणचे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवलीत पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. आतापर्यंत इतरांचे राजकीय अस्तित्व ठरवणाऱ्या राणेंचे राजकीय अस्तित्व आता भाजप ठरवणार असल्याचे ते म्हणाले. नाईक यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला. ते म्हणाले, नितेश यांनी अगोदर आपल्या वडिलांना विचारावे की त्यांना ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी पक्ष का बदलला? त्यांना आलेल्या नोटीसचे काय झाले? वडिलांनी नेमका कोणता समझोता केला? हे अगोदर जनतेसमोर आणावे, मग इतरांना उपदेश करावा.

बातम्या आणखी आहेत...