आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतीस्थळ वाद:नारायण राणे म्हणाले- कोणाला गोमूत्र शिंपडायचं शिंपडू द्या, कोणाला प्यायचं त्याला पिऊ द्या; यात माझा काय संबंध?

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी काल मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरूवात केली होती. दरम्यान, त्यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर जाऊन आशीर्वाद घेत पुष्पहार अर्पण केले. यानंतर शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज पत्रकार परिषदेत बोलत होते.

काय म्हणाले नारायण राणे?

मला कोणासमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं, नमस्कार करावासा वाटतो हा माझा प्रश्न आहे. त्यामुळे यामध्ये कोणाला गोमूत्र शिंपडायचं शिंपडू द्या. कोणाला प्यायचं त्याला पिऊ द्या. यात माझा काय संबंध? मला विचारल्यापेक्षा त्यांना जाऊन विचारा की, यामध्ये दुषित काय झालं होतं. मी काय गोमूत्राचं उत्तर द्यायला इथं आलो आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांशी केला.

आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले होते नारायण राणे
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला मुंबई विमानतळावरुन सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आशीर्वाद घेतला असून पुष्पहार अर्पण केले. यानंतर शिवसेना नेत्यांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळाला. राणे तेथून गेल्यानंतर काही शिवसैनिकांनी जाऊन गोमूत्र व दूधाने स्मारकाचे शुद्धीकरण केले. याप्रसंगी शिवसेना खासदार संजय राऊत आणि आमदार राऊत यांनी नारायण राणे यांच्या स्मारकावर जाण्याला विरोध दर्शवला.

बातम्या आणखी आहेत...