आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींकडून ठाकरेंचे कौतुक:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र सरकारचे कार्य योग्य दिशेने, पीएम मोदींनी मुख्यमंत्र्यांना फोन करून केले राज्य सरकारचे कौतुक

मुंबई / नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात महाराष्ट्र आणि केंद्र सरकारमध्ये समन्वय नसल्याचे आरोप राजकीय वर्तुळात होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर संवाद साधला. यामध्ये दोन्ही नेत्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती कशी हाताळावी आणि ऑक्सिजनचा पुरवठा कसा नियमित करता येईल या मुद्द्यांवर चर्चा केली. या दरम्यान, महाराष्ट्र सरकारची कोरोनाविरुद्धची कामगिरी योग्य दिशेने असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवर चर्चा करताना म्हटले, की मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांचे सरकार महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरुद्ध चांगला लढा देत आहे. केंद्र सरकारने वेळोवेळी महाराष्ट्र सरकारला सहकार्य केले आहे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या मार्गदर्शनुसार चांगली कामगिरी करत असून राज्य सरकारचे कामकाज योग्य दिशेने सुरू आहे. पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. सोबतच, महाराष्ट्राला दिलेले काही सल्ले देखील स्वीकारले आहेत."

लसीकरणासाठी राज्याच्या स्वतंत्र पोर्टलची मागणी
तत्पूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून लसीकरणासाठी राज्याचे वेगळे पोर्टल आणि अॅपची मागणी केली. केंद्र सरकारने यासाठी परवानगी द्यावी असेही आवाहन केले. CoWIN पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्याने ही मागणी करण्यात आली आहे. देशात याच पोर्टलवरून लसीकरणाचे कामकाज सुरू आहे. याच पोर्टलच्या माध्यमातून लोक लसीकरणासाठी बुकिंग करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा शनिवारी बातचीत केली. तत्पूर्वी शुक्रवारी मोदींनी मणीपूर, त्रिपुरा आणि सिक्किमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तर त्यापूर्वी आंध्र प्रदेश, ओडिशा, झारखंड आणि तेलंगणासह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आणि नायब राज्यपालांसोबत चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला.

महाराष्ट्रात एकूण 50 लाख लोक कोरोना संक्रमित
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 54 हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण सापडले. याच दरम्यान, कोरोनाने 898 जणांचा बळी घेतला. राज्यात रोज सापडणाऱ्या नवीन रुग्णांचा आकडा गेल्या अनेक दिवसांपासून 50 हजारांच्या जवळपास आहे. एकूणच 49,89,758 रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. तर 74 हजारांपेक्षा अधिक लोकांचा जीव गेला. तरीही राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

बातम्या आणखी आहेत...