आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेश म्हस्के यांचे सूचक विधान:देखो आज के बम का धमाका; पुन्हा उडणार आहे भडका, सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडका..!

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी एक सूचक ट्विट करत ठाकरे गटाला 'देखो आज के बम का धमाका' म्हणत मोठा इशारा दिला आहे. 'आज पुन्हा एकदा उडणार आहे भडका, सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडका..' असे सूचक विधान नरेश म्हस्के यांनी केले आहे.

नाशिकच्या संपर्क प्रमुखांसह, माजी आमदार, माजी 12 नगरसेवक आणि पदाधिकारी यांनी मागील 15 दिवसात ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ आहे. यातच शहरातील ठाकरे गटातील आणखी काही पदाधिकारी हे शिंदे गटामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर नरेश म्हस्के यांचा ट्विटकडे पाहिले जात आहे.

शिवसेनेला मोठा धक्का

नरेश म्हस्के हे नाशिकच्या राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. नाशिकमधील ठाकरे गटाच्या राजकीय घडामोडींवर ते वारंवार भाष्य करत असतात. आजही त्यांनी केलेल्या ट्विटची चर्चा सुरु आहे. संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यापूर्वी शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे 50 पदाधिकारी आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

ठाकरे गटात मोठे खिंडार पडणार असल्याचे ट्विट नरेश म्हस्के यांनी केले आहे. कवितेच्या माध्यमातून त्यांनी सूचक विधान केले आहे.

नरेश म्हस्के यांची कविता

आज पुन्हा एकदा उडणार आहे भडका सपक झालेल्या डाळीला दिलाय आम्ही तडका

सकाळच्या भोंग्याला पुन्हा एक चपराक बसेल खरे मावळे कुठे आहेत सगळ्या जगाला दिसेल

बाळासाहेबांच्या नावावर राष्ट्रवादीचे दुकान चालवले म्हणून खरे शिवसैनिक एकेक करून सोडून चालले

बसा आता टाळ कुटत, चाललाय सगळा ताल चुकत एकेक संधी चालली हुकत, तरी यांना कोणी नाही रोखत

नरेश म्हस्के यांचे ट्विट.
नरेश म्हस्के यांचे ट्विट.

राऊत यांचे निकटवर्तीय शिंदे गटात

नाशिक महापालिकेचे बारा माजी नगरसेवक आणि त्यांची शेकडो कार्यकर्ते तसेच उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे आणि संजय राऊत यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाऊसाहेब चौधरी, आणि जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. संजय राऊत यांच्या मागील दौऱ्यानंतर नाशिकमध्ये ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. यामुळे आता संजय राऊत यांचा आजचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...