आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंत पाटील, अजित पवारांत शीतयुद्ध:नरेश म्हस्केंचा आरोप, म्हणाले - बारामती बालेकिल्ला मग अर्थमंत्र्यांच्या दौऱ्याला का घाबरले?

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''सध्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे. विशेष म्हणजे शिर्डीतील राष्ट्रवादीच्या शिबिरात अजित पवार यांना भाषण करायला संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार असा टोलाही नरेश म्हस्के यांनी लगावला. त्यांनी याबाबत एक व्हिडीओही जारी केला आहे.

आयोजकांना धन्यवाद द्यावा

नरेश म्हस्के म्हणाले, सध्या राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात शितयुद्ध सुरू आहे. यात अजित पवार यांनी आज सकाळी भाषण करायला दिले त्यामुळे आयोजकांना धन्यवाद दिले पाहीजे.

दिल्लीतील प्रकार बघा

नरेश म्हस्के म्हणाले, दिल्लीत नुकतेच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. त्यावेळी जयंत पाटलांच्या नावाची घोषणा भाषणासाठी झाली, त्यावेळी अजित पवारांचे नाव घेतले. त्यानंतर अजित पवार ताड्कन सभागृहातून निघून गेले. त्यानंतर शरद पवारांच्या भाषणावेळीही अजित पवार यांचे नाव घेतले तसेच सुप्रिया सुळे या गेल्यानंतरही सभागृहात अजित पवार आले नाही त्यांनी भाषण केले नाही. पवारांचे भाषण सुरू झाल्यानंतरच अजित पवार व्यासपीठावर आले.

वेगळे सांगण्याची गरज नाही

नरेश म्हस्के म्हणाले, युती सरकारविरोधात कोण जास्त बोलतेय अशी स्पर्धाच अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात लागली आहे. त्यामुळे अजित पवारांनी युती सरकारच्या भविष्याबद्दल भाष्य केले असावे. सरकार किती दिवस टिकणार कोणासोबत कोण गेले आणि कोण जाणार यात वेगळे सांगण्याची काय गरज आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व आमदार आहेत.

तेव्हा ते घाबरले!

राष्ट्रवादीचे स्वप्न कधी पूर्ण होणार नाही. मध्यंतरी युवानेते रोहित पवार यांनी आमच्या घराण्यात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे विधान केले. अन्य राजकीय पक्षांना नेत्यांना बाजूला करून, फूट पाडून जो पक्ष वेगला झाला त्यांच्याकडून हे विधान संयुक्तिक वाटत नाही. राष्ट्रवादी पक्षाचा इतिहास जाणून घ्यावा. त्यांनीही आत्मपरीक्षण करावे. बारामती हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, निर्मला सीतारामन बारामतीत येऊन गेल्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा दौरा केला एवढे का घाबरले?

बातम्या आणखी आहेत...