आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अजून झालेला नाही. त्यामुळे अजूनही आम्हाला विश्वास कायम आहे. 16 आमदार अपात्र झाले तर त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील अपात्र होतील, आणि सरकार कोसळेल, असा दावा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिली आहे.
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील. मात्र नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत.
ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. नरहरी झिरवळ म्हणाले, अपात्रतेच्या निर्णयावर चर्चा होईल. 16 आमदारांचे निलंबन झाले तर परिस्थिती वेगळी असेल. गटनेत्याच्या बाबतीतच आता संशय बळावत आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता, हे काही अंशी खरे आहे. शरद पवार साहेबांच्या मनात त्यावेळी देखील हे होते. ते बारकाईने अभ्यास करतात.
अधिकार अध्यक्षांकडे राहील
गेल्या वर्षी जूनमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केल्याबद्दल शिंदे आणि अन्य 15 आमदारांना अपात्र ठरवता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मोठे घटनापीठ हा निर्णय देत नाही तोपर्यंत हा अधिकार अध्यक्षांकडे राहील.
संबंधित वृत्त
सरकारने बोजा बिस्तरा बांधावा:नैतिकता शिल्लक असेल तर एकनाथ शिंदे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अनिल परब यांची मागणी
सरकारने आपला बोजा बिस्तरा बांधावा. नैतिकता शिल्लक असेल तर एकनाथ शिंदे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केली आहे.
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील. नार्वेकर सध्या लंडन दौऱ्यावर आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.