आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नसीम खान यांचा दावा:महाराष्ट्रात 2024 मध्ये काँग्रेस आघाडी सरकार येणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात २०२४ मध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार असेल, असा दावा महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी बुधवारी केला. तसेच २०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस केंद्रात बिगर-भाजप सरकार स्थापन करेल, या पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो, असेही ते म्हणाले. नांदेड जिल्ह्यासाठी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे प्रभारी असलेले माजी मंत्री नसीम खान पुढे म्हणाले की, भारत जोडो यात्रा तेलंगणमधून देगलूरमध्ये ७ नोव्हेंबरला सकाळी ७ वाजता पोहोचेल. ही यात्रा महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांतून जाणार असून हे अंतर ३८२ किमीचे आहे. मध्य प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रात ही भारत जोडो यात्रा १४ दिवस असेल.

बातम्या आणखी आहेत...