आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवसेनेला धक्का देत भाजपमध्ये घरवापसी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांचा मुंबईतील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश झाला.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बाळासाहेब सानप यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'भाजपमध्ये काम करताना अनेकजण जोडले गेले. पक्ष मोठा करण्यासाठी खूप काम केले. मधल्या काळात थोडासा दुरावा आला, पण संघ आणि भाजपचे काम केलेला माणूस दुसरीकडे रमू शकत नाही म्हणून पुन्हा भाजपात प्रवेश करत आहे, अशा भावना त्यांनी बोलून दाखवल्या.
बाळासाहेब सानप भाजप पुन्हा प्रवेश करतात याचा आनंद - देवेंद्र फडणवीस
यावेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सानप यांचे पक्षात स्वागत केले. 'बाळासाहेब सानप भाजप पुन्हा प्रवेश करतात याचा आनंद आहे. समज-गैरसमज तयार झाले आणि त्यातून अंतर निर्माण झाले, पण मनाने ते आमच्यामध्ये होते. भाजप माझा पक्ष आणि माझे जीवन इथेच घालवायचा आहे, असं बाळासाहेब सानप यांनी मला सांगितले. त्यासाठी कुठलेही निगोसिएशन करावे लागले नाही. बाळासाहेब परत आल्यामुळे भाजपमध्ये नवचैतन्य येईल. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये कुठलीही अडचण येणार नाही," असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.
सानप यांच्याकडे लवकरच मोठी जबाबदारी- चंद्रकांत पाटील
'विचार आणि ध्येयाने काम करणारी माणसे फार काळ एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे ते भाजपात आले आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिली. तसेच, सानप यांच्या क्षमता आहे, त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार येईल, अशी घोषणाही पाटलांनी यावेळी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.