आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Activities Under 'Swarajya Mahotsavam' In The State Today At 11 Am Group Singing Of National Anthem; Every Citizen Should Participate In Activities Chief Minister

‘स्वराज्य महोत्सवां’तर्गत उपक्रम:महाराष्ट्रभरात राष्ट्रगीताचे समूहगान; राज्यभरात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 22 हजार फूट उंचीवरून उडी मारत हवेत तिरंगा फडकवला

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पॅरा रेजिमेंटचा कमांडो आणि सातारा जिल्ह्यातील सुपूत्र सूरज शेवाळे याने काश्मीरमध्ये चार्टर्ड विमानातून 22 हजार फूट उंचीवरून उडी मारत हवेत तिरंगा फडकवला. त्याचा हवेत तिरंगा फडकवतानाचा फोटो व व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सूरज हा सातारा जिल्ह्यातील चोपदारवाडी (ता. पाटण) गावचा रहिवासी आहे. 2017 साली तो सैन्यात भरती झाला. सध्या जम्मू - काश्मीरमध्ये कार्यरत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण हवेत उंचावर तिरंगा फडकवण्याचा निर्धार केला होता, असे सूरज शेवाळेने ग्रामस्थांशी तसेच कुटुंबियांशी बोलताना सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात स्वराज्य महोत्सव सुरू आहे. या उपक्रमांतर्गत आज सकाळी 11 वाजता एक मिनिटासाठी सामूहिक राष्ट्रगीत गायन हा उपक्रम राबविण्यात आला. राज्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह नागरिकांनी यात सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. विधानभवनातही राष्ट्रगीत म्हणण्यात आले.

एकनाथ शिंदे आवाहन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने राज्यात स्वराज्य महोत्सवांतर्गत सामूहिक राष्ट्रगीताचा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. देशप्रेम व्यक्त करण्यासाठी राज्यातील अबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा, नागरिकांनी समूहाने किंवा वैयक्तिक आणि ते जिथे असतील तिथून राष्ट्रगीत गावे असे एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले होते.

उज्ज्वल परंपरा जपण्यासाठी उपक्रम

सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय म्हणाले की, देशभक्ती आणि उज्वल परंपरा जोपासण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांच्या मनात आपल्या राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताच्या बाबतीत पवित्र भावना आहेच, याच पवित्र भावनेला जगासमोर आणण्यासाठी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.

सर्वांनी नोंदवला सहभाग

राज्यातील अंगणवाडय़ा, सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारची विद्यापीठे, खाजगी- शासकीय सर्व शैक्षणिक संस्थामधील विद्यार्थी, अनेक व्यापारी प्रतिष्ठाने, सेवा पुरवठादार, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिकांनी या उपक्रमात सहभागी झाल्याचे दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...