आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) राष्ट्रीय दर्जा रद्द केला आहे. यासह तृणमुल काॅंग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चा राष्ट्रीय दर्जा रद्द झाला आहे. या तीनही पक्षांना निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे.
तत्पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने या तिन्ही पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाबाबत आढावा घेतला होता त्यानंतर या पक्षाला दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा संपुष्टात आणला. तर राष्ट्रवादीचा मुळ पाया हा महाराष्ट्रात असून काही राज्यात त्यांचे लोकप्रतिनिधी आहेत.
राष्ट्रीय पक्ष होण्यासाठी काय आहेत अटी?
सध्या किती आहेत राष्ट्रीय पक्ष?
भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, NPP हा भारतातील सर्वात नवीन राष्ट्रीय पक्ष आहे. या पक्षाला 2019 मध्ये राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली.
'आप'ला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा
दिल्लीच्या राजकारणातून उदयाला आलेल्या आम आदमी पक्षाला गुजरात निवडणुकीनंतर राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे जवळपास निश्चित झाले होते. त्यानंतर या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला. गुजरातमध्ये 'आप'ने 5 जागा जिंकल्या होत्या. सध्या दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. गोवा विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षाला एकूण मतांपैकी 6.8 टक्के मते मिळाली आहेत. येथे आपचे 2 उमेदवार विजयी झाले होते. ऑगस्ट महिन्यातच निवडणूक आयोगाच्या घोषणेनुसार 'आप' गोव्यातही मान्यताप्राप्त पक्ष बनला होता.
राष्ट्रवादी काॅंग्रेसची 1999 ला स्थापना
शरद पवार यांच्या नेतृत्वात 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन झाली. सोनिया गांधी यांचा भारतीय राजकारणात प्रवेश झाल्यानंतर विदेशी जन्माचा मुद्दा समोर करून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाची स्थापन करून वेगळी चूल मांडली. त्यावेळी त्यांच्यासोबत पी. ए. संगमा आणि तारेक अन्वर यांनीही काॅंग्रेस सोडून शरद पवारांना साथ दिली होती.
काॅंग्रेसमधून झाले होते निलंबन
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी जन्माचा मुद्दा शरद पवारांनी त्यावेळी उपस्थित केला होता. तसे पत्रही त्यांनी काँग्रेस नेतृत्वाला लिहले होते. काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीनंतर शरद पवार यांच्यासह तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांना सहा वर्षासाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आले होते. काँग्रेस पक्षानं निलंबनाची कारवाई केल्यानंतर शरद पवार यांनी बिहारमधील तारिक अन्वर आणि मेघालयातील पी. एम. संगमा यांच्या साथीने सन 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.
शिवाजी पार्कमध्ये स्थापना, अधिवेशनही
शिवाजी पार्क येथे नव्या पक्षाची स्थापना तेव्हा पवारांनी केली. पण मुळ विचारधारा काँग्रेसची असल्याने पक्षाचे नाव राष्ट्रवादी काँग्रेस ठेवावे असे ठरले. त्यानंतर नामकरणही झाले. शिवाजी पार्क येथे पक्षाचे पहिले अधिवेशन घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड आज महाराष्ट्र तसेच इतर राज्यातही सुरू आहे.
पवारांचा साडेपाच दशकांपासून दबदबा
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात गेल्या साडेपाच दशकांपासून शरद पवार या नावाचा दबदबा आहे. राजकारणात मुरब्बी म्हणून शरद पवारांची ओळख पूर्वीपासून आहे. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात राज्यात निवडणुका लागल्या. या निवडणुकांनंतर राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबत सत्तेत आला. पक्षाच्या 22 वर्षांच्या इतिहासात हा पक्ष मोजकेच वर्ष सत्तेबाहेर राहिला आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभव
2014 मध्ये महाराष्ट्रासह देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा चालला आणि काॅंग्रेससोबतच राष्ट्रवादी काँग्रेसलाबी सत्तेबाहेर राहावे लागले ते आजपर्यंत. 2019 च्या विधानसभा निवणडणुकीत राष्ट्रवादीला समीश्र यश मिळाले व त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत त्यांनी मविआ सरकार स्थापन केले.
साताऱ्यातील पाऊस आणि शरद पवार!
2019 ला साताऱ्यातील पावसातील वादळी सभेने शरद पवार नावाची ताकद महाराष्ट्राला पुन्हा एकदा दिसली. राष्ट्रवादीला एक नवी उर्जा दिली. विधानसभा निकालानंतर राज्यात सत्तांतर झाले. यानंतर शिवसेना आणि काँग्रेस या भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांना एकत्र आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका होती.
नागालॅंडमध्ये राष्ट्रवादीला यश
नुकत्याच इशान्येकडील तीन राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला नागालॅंडमध्ये मोठे यश प्राप्त झाले. यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते की, राष्ट्रवादीला नागालॅंडमध्ये चांगले यश मिळाले आहे. आम्ही नागालॅंड येथे 12 जागा लढविल्या आणि तेथील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 8 उमेदवारांना विजयी करीत काम करण्याची संधी दिली. विशेष म्हणजे नागालॅंडला राष्ट्रवादी पक्ष दोन नंबरचा पक्ष झालेला आहे. जो सत्ताधारी पक्ष आहे त्याचे सरकार बनेल.
आधी विरोधी पक्ष, नंतर सरकारमध्ये!
नागालॅंडमध्ये प्रमुख विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काॅंग्रेसला संधी होती, मात्र शरद पवार यांनी तेथील एन. रियो यांच्या सरकारमध्ये सामिल होणार असल्याचे विधान केले होते. आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचीही भूमिका आहे. नागालॅंडच्या ऐक्यासाठी एकत्र आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते व सरकारसोबत राहू असे सांगितले होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.