आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोमवारी सकाळी ऐरोलीमध्ये एका 12 वर्षांच्या मुलाचा वीजेचा करंट लागल्याने मृत्यू झाला. मुलाने रस्त्याच्या कडेला ठेवलेल्या लोखंडाच्या शिडीला स्पर्श केला होता. या शिडीचा स्पर्श वीजेच्या तारीशी झालेला होता. यामध्ये हाय व्होल्टेज करंट असल्याने काही सेकंदांमध्ये मुलाच्या संपूर्ण शरीरात आग लागली आणि त्याचा मृत्यू झाला.
अशी घडली दुर्घटना
रबाले पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांनी सांगितले की, मुलाची ओळख पटू शकलेली नाही. तो फुटपाथवरच राहायचा. ही घटना सोमवारी सकाळी जवळपास ऐरोलीच्या सेक्टर 7 मध्ये 8.52 वाजता शिव शंकर प्लाजा 2 मध्ये दुकान नंबर 7 समोर घडली. ही घटना तेथील CCTV कॅमेरांमध्ये कैद झाली आहे. व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी अॅक्सीडेंटल डेथ रिपोर्ट (ADR) दाखल केला आहे.
योगेश गावडे यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंबाचा पत्ता लागलेला नाही. आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. तसेच लोखंडाची एवढी मोठी शिडी तिथे का ठेवली होती, याचाही तपास आम्ही करत आहोत. जर या निष्काळजीपणात कुणी दोषी असेल तर कठोर कारवाई केली जाईल.
तक्रार दाखल करण्यात आली
सामाजिक कार्यकर्ते बापू पोळ यांनी सांगितले की, मुलगा ट्रॅफिक सिग्नलवर खेळणी विकायचा. अशा प्रकारे शिडी ठेवणे खूप मोठा निष्काळजीपणा आहे. आम्ही या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी.
वीज कंपनीचे स्पष्टीकरण
मुंबईमध्ये इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणाऱ्या MSEDCL द्वारे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 21 फेब्रुवारीला दिवा फीडरवर दिवा गांवमध्ये लेंसकार्ट शॉपसमोर ठेवलेली शिडी कुणीतरी ढकलून विजेच्या तारेजवळ चिटकून ठेवली होती. ज्यानंतर त्यामध्ये 11KV चे करंट उतरले होते. 22 फेब्रुवारी रोजी डिवा फीडर ट्रिप सकाळी 8.52 वाजता सुटली. पीडितने शिडीच्या खंब्याला पकडलेले होते आणि त्याने चप्पल घातलेली नव्हती, यामुळे त्याला शॉक लागला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.