आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगरी समाज आक्रमक:बाळासाहेबांच्या नावाला विरोध; नवी मुंबई विमानतळाला दि. बा. यांचेच नाव हवे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दि. बा. पाटील आगरी समाजाचे दैवत

नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे असलेले नियोजन रद्द करून भूमिपुत्र दि. बा. पाटील यांचे नावे द्यावे, या मागणीसाठी गुरुवारी नवी मुंबईत विशाल आंदोलन झाले. याप्रकरणी आंदोलकांनी राज्य सरकारला १५ आॅगस्टची मुदत दिली आहे. नवी मुंबई विमानतळाचे प्राधिकरण असलेल्या सिडकोच्या (शहर व औद्योगिक महामंडळ) संचालक मंडळाने बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव राज्य सरकारला पूर्वी पाठवलेला आहे.

मात्र, त्याला स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध आहे. याप्रकरणी भाजप, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकापसह सर्वपक्षीयांनी सिडकोला घेराव घालण्याचा इशारा दिला होता. गुरुवारी सकाळी हजारो मोटारगाड्या, दुचाकी व पायी लाखो भूमिपुत्र बेलापूर येथील सिडको कार्यालयावर चालून गेले. आगरी, कोळी नवी मुंबई व लगतच्या ठाणे जिल्ह्याचे भूमिपुत्र असून नवी मुंबई वसवण्यासाठी त्यांनी जमिनी दिल्या आहेत. आगरी, कोळी समाजाच्या आंदोलनाचा इतिहास हिंसक असल्याने पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.

आता सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
नवी मुंबई हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे याबाबतचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला आहे. दि. बा. पाटील यांच्याबद्दल शिवसेनेला आदर आहेच. सिडकोने जो ठराव केला आहे त्यावर सरकार काय भूमिका घेते त्यावर पुढचे अवलंबून आहे, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

दि. बा. पाटील आगरी समाजाचे दैवत
1. दिवंगत दि. बा. पाटील हे आगरी समाजाचे नेते होते. प्रकल्पग्रस्तांना सिडकोने विकसित केलेल्या जमिनीतील १२.५ टक्के जमीन परत करण्याचा लढा त्यांनी उभारला व तो जिंकून दिला आहे. परिणामी आगरी समाज त्यांना दैवत मानतो.
2. शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या प्रश्नावर कोंडीत सापडले आहेत. शिवसेनेने भूमिका न बदलल्यास उत्तर रायगड व ठाणे जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेला फटका बसू शकतो.
3. आंदोलन सर्वपक्षीय असले तरी भाजपचे स्थानिक मातब्बर नेते व बडे सरकारी ठेकेदार रामशेठ ठाकूर यांचा या आंदोलनास मुख्य पाठिंबा आहे. राज्यातील भाजप नेतृत्वाने मात्र याप्रकरणी सोयीने चुप्पी साधली आहे.

बातम्या आणखी आहेत...