आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Navi Mumbai Airport, Mns Raj Thackeray Comment On Navi Mumbai International Airport Name Issue; Airport In Navi Mumbai Should Be Named After Chhatrapati Shivaji Maharaj Raj Thackeray

विमानतळाच्या नामांतराचा मुद्दा:'नवी मुंबईत होणाऱ्या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव असायला हवे'-राज ठाकरे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचेच तेएक्स्टेंशन आहे'

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतराचा वादात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विमानतळाच्या नावाबाबत मनसेची भूमिका स्पष्ट केली. 'नवी मुंबईत होत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचेच तेएक्स्टेंशन आहे, त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव असेल,' असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावाच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रशांत ठाकूर यांनी नवी विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली. तसेच, नामांतराच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते राज ठाकरेंना भेटले होते. त्यांच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी ते म्हणाले की, प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले. नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याची त्यांची मागणी आहे. सरकारची भूमिका आहे बाळासाहेबांचं नाव देण्याची. माझा पाठिंबा घेण्यासाठी ते आले होते. कोणतेही विमानतळ येते, ते शहराबाहेर येते. तेव्हाची मुंबई पकडली, ते विमानतळ सांताक्रूझला गेले. त्यावेळी मुंबई विकसित झालेली नव्हती. मग वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि मग त्याला सांताक्रुझ विमानतळ आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आलं. मागे जेव्हा असे विमानतळ बनवायचे ठरले होते, तेव्हा मी जीव्हेकेंना विचारलं हे कसलं विमानतळ आहे. त्यांनी माहिती दिली होती, आताचं विमानतळ आहे ते डोमेस्टिक असेल, आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. आता जे विमानतळ नवी मुंबईत होत असलं तरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुनच टेक ऑफ होणार आहे. ते मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळेच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव राहणार, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी मांडली.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, 'नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई विमानतळाचेच तेएक्स्टेंशन आहे, त्यामुळे विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचेच नाव असेल', असे राज ठाकरे म्हणाले. तसेच, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाबाबत प्रश्न विचारला असता, राज ठाकरे म्हणाले की, 'आज स्वतः बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तरी, त्यांनीही शिवरायाचेच नाव सूचवले असते. मुळात विमानतळांना नाव देण्याचं केंद्र सरकार ठरवतं. त्यामुळे आंतरराष्ठ्रीय विमानतळ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच होईल. शिवरायांच्या नावापुढे कुणीच नाही, त्यामुळे त्यांच्या नावाला कुणीच विरोध करणार नाही. नवी मुंबईतील विमानतळ हे मुंबई विमानतळ म्हणूनच ओळखलं जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...