आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील धक्कादायक घटना:15 वर्षांच्या मुलीने आईचा गळा आवळला, हत्येनंतर नातेवाईकांना पाठवली सुसाईड नोट; कारण ऐकून बसेल धक्का!

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हत्येच्या 9 दिवसानंतर मुलीला अटक

नवी मुंबईतील ऐरोली भागातून एक अतिशय धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अभ्यास करण्यास वारंवार सांगितल्यामुळे संतप्त 15 वर्षीय मुलीने कराटेच्या बेल्टने आईचा गळा दाबून खून केला आहे. या घटनेमुळे ऐरोली भागात मोठी खळबळ उडाली आहे. आई आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न पाहत असल्याने ती वारंवार प्रवेश परीक्षेसाठी (NEET) अभ्यास करण्यास सांगत होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना नवी मुंबईतील ऐरोली भागात 30 जुलै रोजी घडली आहे. पोलिसांनी सदरील प्रकरणात अल्पवयीन मुलीला अटक केली असून तीच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, अल्पवयीन आरोपीने या खूनाची कबूली दिली आहे. संबंधित घटनेचा तपास करणारे एपीआय अविनाश महाजन यांनी सांगितले की, 30 जुलै रोजी शैलेश पवार नामक व्यक्तींना त्यांना माहिती देत ऐरोली भागात राहणारी त्यांची बहीण शिल्पा जाधव हीने तीच्या फ्लॅटचा दरवाजा आतून बंद केले असल्याचे सांगितले.

कराटे बेल्ट गळ्यात गुंडाळलेला आढळला
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडला. त्यानंतर तेथे शैलेश याची 15 वर्षांची भाची आणि 6 वर्षांचा पुतण्या जमिनीवर बसलेले दिसले. त्यानंतर बेडरुमचा दरवाजा तोडल्यानंतर शिल्पा जाधव ही जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत आढळली. दरम्यान, तीच्या गळात कराटे बेल्ट गुंडाळलेला दिसून आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शिल्पा जाधव हीला रुग्णालयात भरती केले. परंतु, तेथे डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले.

हत्येच्या 9 दिवसानंतर मुलीला अटक
पोलिसांनी हत्येनंतर सदरील घटेनचा तपास सुरुच होता. परंतु, 9 दिवसांनंतर अल्पवयीन मुलीने आपल्या आईचा खून केल्याचा गुन्हा कबूल केला. यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर हत्येचे कारण विचारले असता सर्व लोकच चक्रावून गेले. आई माझ्यावर अभ्यास करण्यासाठी दबाव आणत होती असे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यानंतर सदरील घटनेत पोलिसांनी रविवारी रात्री अल्पवयीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...