आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नवनीत राणा यांनी आता नवा आरोप केला आहे. तुरुंग प्रशासनाने त्यांच्यावर दुर्लक्ष केले. तुरुंग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे प्रकृती अधिक बिघडली असून आपण याविरोधात कोर्टात जाणार' असल्याचे नवनीत राणा यांच्या वकीलांनी म्हटले आहे. तत्पुर्वी त्यांची आज संपुर्ण चाचण्या आणि एमआरआयही तपासणीही करण्यात आली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा दिल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. नवनीत राणांची भायखळा कारागृहातून 5 मे रोजी 12 व्या दिवशी सुटका झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना संध्याकाळी 5 ऐवजी दुपारीच सोडण्यात आले होते.
कारागृहातुन बाहेर आल्या नंतर नवनीत राणा घरी न जाता थेट लीलावती रुग्णालयात भरती झाल्या. छाती, मान आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना तसेच स्पॉन्डिलायटिसचा त्रास होत असल्याने त्यांचे एमआरआय स्कॅन आणि संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे.
नवनीत राणा यांना प्रकृतीचा त्रास जाणवत असल्याने त्यांना जेलमधून बाहेर सोडताच लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रशासनाविरोधात राणांच्या वकीलाचा इशारा
लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या नवनीत राणा यांच्याकडे तुरुंग प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. तुरुंग प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नवनीत राणा यांची प्रकृती अधिक बिघडली असून आपण याविरोधात कोर्टात जाणार' असल्याचे नवनीत राणा यांच्या वकीलांनी म्हटले आहे.
राणा दाम्पत्याला जामीन मंजूर -
राज्यात लाउडस्पीकरवरून वाद सुरू होता. त्याचवेळी नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा वाचणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा हे मुंबईत आले होते. यावरून शिवसैनिकही आक्रमक झाले होते. त्यांनी मातोश्रीबाहेर कडा पहारा दिला होता. त्यानंतर शिवसैनिकांनी राणा यांच्या मुंबईतील घराबाहेर निदर्शने केली होती. तसेच पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ते बारा दिवसांपासून कारागृहात होते. मुंबई सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांना बचाव पक्षाचा युक्तीवाद मान्य झाला. आणि अनेक अटींसह राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करण्यात आला.
न्यायालयाच्या या आहेत 4 अटी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.