आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात शनिवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. कोरोनाचा धोका पाहता राज्य सरकारने गेल्या 6 महिन्यांपासून मंदिरे बंद ठेवलेली आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी राज्याचे दोन प्रमुख मंदिर म्हणजे मुंबईची मुंबा देवी आणि कोल्हापूररच्या महालक्ष्मी मंदिराबाहेर भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. दोन्ही मंदिरांचे दरवाजे बंद असूनही भक्त मंदिरा बाहेरुनच दर्शन घेताना दिसले. दोन्ही मंदिरांमध्ये भक्तांसाठी ऑनलाइन दर्शन सेवा सुरू झाली आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मुंबादेवीमध्ये अभिषेक-पूजनानंतर मंगळा आरती झाली. मंगळा आरतीदरम्यान भक्त मंदिराबाहेरुन देवीचे दर्शन घेत असताना दिसले. यानंतर सकाळची महाआरती झाली. मंदिराचे पुजारी मंगळा आरती, महाआरती, नैवेद्य आरती, धूप आरती, सायंकालीन महाआरती आणि शयन आरती ठरलेल्या वेळेवर करत आहेत
केवळ मंदिरातील पुजारीच या आरतीमध्ये सहभागी होत आहेत
मंदिराचे पुजारी पंडित संदीप भट्ट यांनी सांगितले की, सामान्य दिवसात मुंबा देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशातून श्रद्धाळू यायचे. मंदिर परिसरात उभे राहण्यासाठीही जागा नसायची. मात्र कोरोनामुळे लॉकडाउनमुळे सरकारी निर्देशांचे पूर्ण पालन केले जात आहे.
भक्तांसाठी मुंबादेवी ट्रस्टने सुरू केली वेबसाइट
कोरोना काळात भक्तांना देवीच्या दर्शनासाठी मुंबादेवी ट्रस्टने आपली वेबसाइट सुरू केली आहे. www.mumbadevi.org.in वर एक क्लिक करुन भक्त देवीचे लाइव्ह दर्शन करु शकतात. मंदिराचे प्रबंधक हेमंत जाधव यांनी सांगितले की, राज्य सरकारने कोरोनाचा धोका लक्षात घेता सध्या मंदिरे उघडण्याची परवानगी दिलेली नाही. यामुळे भक्तांसाठी ऑनलाइन सुविधा सुरू करण्यात आली आहे.
महालक्ष्मी मंदिरात तोफेच्या सलामीने सुरू झाली नवरात्र
देवीचे 51 शक्तिपीठ मानले जातात. यामध्ये 9 शक्तिपीठ प्रमुख आहेत. या 9 शक्तिपीठांमधून कोल्हापूरातील महालक्ष्मी मंदिरही आहे. नवरात्रीच्या पूर्ण संध्येला मंदिर परिसराला रंगीत लाइट्सने सजवण्यात आले होते. मंदिराचे दरवाजे सामान्य भक्तांसाठी बंद आहेत मात्र महालक्ष्मीची पूजा सुरू आहे. जुन्या परंपरेनुसार येथे तोफेच्या सलामीने नवरात्र उत्सवाची सुरुवात करण्यात आली. येथेही भक्त मंदिराच्या मुख्य दरवाज्याबाहेर उभे दिसले.
भक्तांसाठी सुरू केले ऑनलाइन दर्शन
कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने भक्तांसाठी यावेळी Live दर्शन सुरू केले आहेत. व्हर्जुअल माध्यमातून भक्त सातत्याने देवी महालक्ष्मीचे दर्शन करु शकतात. मंदिराच्या अधिकृत सोशल मीडिया पेज आणि वेबसाइटवर हे बघता येऊ शकते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.