आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिकांना अटक:नवाब मलिक यांच्या अटकेनंतर मुंबईत भाजपकडून फटाके फोडून जल्लोष साजरा

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अटकेनंतर, मुंबईत भाजपकडून फटाके फोडून नवाब मलिक यांच्या अटकेचा, आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर मुंबईचे अध्यक्ष अमर शाह म्हणाले- आज एका देशद्रोहीला अटक करण्यात आली आहे. जे बॉम्बस्फोट आरोपी दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे. त्यात पैशांच्या व्यवहारात गुंतलेली आहे. नवाब मलिक तेच राज्यमंत्री आहेत जे देवेंद्र फडणवीस, मोहित कंबोज यांसारख्या भाजप नेत्यांवर आरोप करत होते.

आता अनिल परबांचा नंबर- किरीट सोमय्या
नवाब मलिकांच्या अटकेनंतर किरीट सोमय्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये बोलताना ते म्हणाले की, अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक यांना अटक झाली आहे. आता तिसरा नंबर अनिल परब यांचा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कितीही दादागिरी केली तरी आम्ही सोडणार नाही. महाराष्ट्रातील सर्व भ्रष्टाचार बाहेर काढणार असे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...