आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिक मंत्रिपदाचा राजीनामा देणार का?:छगन भुजबळ म्हणाले- नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही, त्यांच्या समर्थनार्थ राज्यभर धरणे आंदोलन

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकरारने घेतली आहे. मलिक यांना राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.

उद्या 10 वाजता मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ सरकारचे मंत्री धरणे देणार. परवापासून राज्यभर शांततेने मोर्चा, आंदोलन, धरणे देऊ असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

काय म्हणाले छगन भुजबळ?

दुर्देवाची गोष्ट आहे की, पहाटे नवाब मलिक यांच्या घरी ईडीचे लोक गेले. तिथून त्यांना घेऊन ते सकाळी सात वाजेच्या दरम्यान, आपल्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. यानंतर चौकशी करुन त्यांना कोर्टात घेऊन गेले. इथे दोन्ही बाजूंनी चर्चा झाली.

1992 सालच्या घटनांशी 1999 सालच्या जागेचा करार आणि त्यानंतर बारा वर्षांनी पीएमएलएचा जन्म झाला. त्या घटनांमध्ये अनेकांवर कारवाया झाल्या या तीस वर्षात नवाब मलिक कुठेही नव्हते. पण आता ते सातत्याने भाजपविरोधात बोलत आहेत. त्यांच्यावर कसा अन्याय होतो हे सांगत आहेत. त्यामुळे त्याचे तोंड बंद करण्यासाठी त्यांच्याविरोधात या कारवाया सुरु आहे, अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीची भूमिका मांडली आहे.

मलिकांकडून चौकशीला सहकार्य नाही!

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सकाळी मलिक यांना मुंबईतील कार्यालयात चौकशीसाठी नेले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाब मलिक चौकशीत अधिकाऱ्यांना सहकार्य करत नव्हते, त्यामुळेच त्यांना अटक करण्यात आली आहे. मलिकांना अटक केल्यानंतर ईडीच्या पथकाने त्यांना रुग्णालयात नेले, जिथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यानंतर त्यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. ईडीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली.

बातम्या आणखी आहेत...