आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:नवाब मलिक मुस्‍लीम असल्‍यांने त्‍यांचा राजीनामा नाही, देशमुख मराठा असल्‍यांन लगेच राजीनामा का ?नितेश राणेंचा सवाल

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवाब मलिक मुस्‍लीम असल्‍यांने त्‍यांचा राजीनामा नाही, देशमुख मराठा असल्‍याने लगेच राजीनामा का घेतला? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना केला.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची २३ फेब्रुवारीला सक्तवसुली संचलनालयाच्या कार्यालयामध्ये चौकशी सुरु झाली. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचे नाव घेतले जाते असे म्हटले होते. पवार यांच्या याच वक्तव्यावरुन आता भाजपा नेते नितेश राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला. मुंबईमध्ये भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी अनिल देशमुख प्रकरण आणि नवाब मलिक प्रकरणाची तुलना करत पवारांवर टीका केली.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने अणुशक्तीनगर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अणुशक्तीनगरमधील विधानसभा वॉर्डमधील कार्यकर्ता संमेलनासाठी नितेश राणेही उपस्थित होते. यावेळेस कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी थेट राष्ट्रवादीच्या अध्यक्षांना नवाब मलिक प्रकरणावरुन धार्मिक संदर्भाचा उल्लेख करत प्रश्न विचारला.

“ते मुस्लीम कार्यकर्ता आहेत म्हणून दाऊदच्या संपर्कात असे संबंध जोडला जातो असे उपरोधिक वक्तव्य शरद पवारांनी केले. त्यावर मी काय बोलणार ते फार मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने त्यांच्याबद्दल बोलता पण कामा नये. पण मी जे बोलतोय ते या देशाचा एक नागरिक म्हणून मला शरद पवार यांना विचारायचंं आहे.

मग देशमुखांचा राजीनामा का घेतला?

``मंत्रीमंडळ सदस्य व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक दाऊदबरोबर उठ-बस करणारे व्यक्ती आहेत. त्यांचा तुम्ही राजीनामा शरद पवार घेत नाही पण अनिल देशमुखांचा राजीनामा का घेतला? मग तोच न्याय नवाब मलिकांना का लावत नाही?,” असा प्रश्न नितेश राणेंनी विचारला. केवळ त्‍यांची जात पाहून वेगळा न्‍याय दिला जातो का असा सवालही त्यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...