आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nawab Malik Enquiry Ed | Chandakant Patil Critisize Nawab Malik | Marathi News | 'Don't Let Nawab Malik Become Anil Deshmukh', Chandrakant Patil's Sharp Criticism In The Press Conference

मलिक ईडीच्या रडारवर:'नवाब मलिकांचा अनिल देशमुख होऊ देऊ नका', चंद्रकांत पाटलांची पत्रकार परिषदेत खोचक टीका

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात गेल्या पाच तासांपासून चौकशी सुरू आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून, ईडी कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. दरम्यान यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

अनिल देशमुख यांच्याबाबतीतही सुरुवातीला आरोप फेटाळले नंतर त्यांचा आवाज क्षीण झाला, आणि आता अनिल देशमुख कोण असा प्रश्न ते आपापसात विचारत आहेत. तसेच होऊ देऊ नका, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, छगन भुजबळ बिचारे दोन वर्ष आतमध्ये होते, आता अनिल देशमुख आतमध्ये आहेत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. कर नाही त्याला डर कशाला, ईडीची चौकशी आली तर घाबरता कशाला, त्यांनी चौकशीला सामोरे जावे, त्यांचा दोष नसेल तर न्यायालय त्यांच्या बाजुने निर्णय देईल, तुम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पाहिजेत, तुम्ही न्यायालयात एकही केस जिंकू शकलेले नाहीत. असा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.

माकडांच्या गोष्टीसारखी त्यांची संस्कृती-पाटील
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांच्या सोबत असले तरी माकडाच्या गोष्टीसारखी त्यांची संस्कृती आहे. पुर आल्यानंतर माकडीन पिल्लाला छातीशी कवटाळून बसते मग छातीशी घेते, मग डोक्यावर घेते, पण तिच्या नाका-तोंडात पाणी गेल्यावर ती पिल्लाला पायाशी घेते. अशी यांची(महाविकास आघाडी सरकारची) संस्कृती आहे. शरद पवार नेहमीच जातीय राजकारण करतात. मराठी विरुद्ध नॉन मराठा, मुस्लिम विरुद्ध नॉन मुस्लिम असे कार्ड ते खेळत असल्याचे पाटील म्हणाले.

आशिष शेलारांची टीका

भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. मी खीर खाल्ली तर बुड बुड घागरी....! असे म्हणत खोचक टोला लगावला आहेत. तसेच ज्याने खीर खाल्ली नाही, त्याने घाबरण्याचे कारण नाही. पण ज्याने ज्याने खीर खाल्ली त्याने त्याने किती ही चेहरा भोळा भाबडा केला, कांगावा केला, तरी घागर बुडणारच! असा मजकूर लिहिलत आशिष शेलार यांनी ट्विट केले आहे.

बातम्या आणखी आहेत...