आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nawab Malik Fears For Remedicivir Injection, Says 'then There Will Be Crisis In Maharashtra'; Important Demands Made To The Central Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीची मागणी:रेमडेसिविर इंजेक्शनविषयी नवाब मलिकांना भीती, म्हणाले - '…तर महाराष्ट्रात संकट निर्माण होईल'; केंद्र सरकारकडे केली महत्त्वाची मागणी

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्याला दिवसातून 50 हजार रेमडेसिविर देण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

देशभरात कोरोना धुमाकूळ घालत असताना दिसत आहे. कोरोना रुग्ण सापडण्याचे रोज नवनवे विक्रम समोर येत आहेत. असे असतानाच देशभरासह राज्यातील मृतांचा आकडा हा झपाट्याने वाढत असताना दिसत आहे. यासोबतच ऑक्सिजन आणि रेमडेसिविरचा मोठा तुटवडा असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. नुकतीच केंद्र सरकारने राज्यांना दिल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या वाटपासंबंधीची माहिती जारी केली. यामध्ये राज्याला दिवसाला 26 हजार रेमडेसिविर दिले जाणार असल्याचा उल्लेख आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांनी नाराजी जाहीर केली आहे.

नवाब मलिक सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाले की, राज्याला दिवसातून 50 हजार रेमडेसिविर देण्यात यावेत अशी मागणी केली आहे. असे केले नाही तर राज्यात मोठे संकट निर्माण होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. मलिक म्हणाले की, 'केंद्र सरकारने नुकतीच राज्यांना रेमडेसिविर इंजेक्शन वाटप करण्याविषयी माहिती जारी केली. मात्र राज्य सरकारला आधीपासूनच मागणी केल्याप्रमाणे दिवसातून 50 हजार इंजेक्शनची आवश्यकता आहे.'

पुढे बोलताना मलिक म्हणाले की, 'सध्या राज्याला दिवसाला 36 हजार रेमडेसिविर इंजेक्शन मिळत आहेत. नवीन वाटपानुसार, महाराष्ट्राला दिवसातून 26 हजार इंजेक्शन मिळणार आहेत. यामुळे सर्वात जास्त रुग्ण असणाऱ्या राज्यामध्ये संकट निर्माण होऊ शकते' तसेच 'केंद्र सरकारने आम्हाला 50 हजार रेमडेसिविर इंजेक्शन देत महाराष्ट्रातील नागरिकांच्या गरजा पूर्ण कराव्यात.' अशी मागणीही नवाब मलिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...