आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत एनसीबीवर हल्लाबोल केला. एनसीबी खोट्या कारवाया करत आहे. खोटे पंच उभे केले जात आहेत. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी असल्याची गंभीर टीका मलिकांनी केली आहे. या वेळी पत्रकार परिषदेत मलिकांनी आपल्या मोबाईलमधील एक कथित ऑडिओ क्लिप देखील जाहीर केली. ती ऑडिओ क्लिप पंच आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यामधले संभाषण असल्याचा मलिकांनी दावा केला आहे.
पंचनामा बदल्याचा फर्जीवाडा एनसीबीकडून सुरू
पुढे मलिक म्हणाले की, एनसीबीचा फर्जीवाडा सुरुच आहे. पंचांना सही करण्यास एनसीबीकडून दबाव आणले जात आहेत. लाखो रुपये खर्च करुन पीआरच्या माध्यमातून खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी देखील यात सहभागी असल्याचा आरोप मलिकांनी लावला. 02 ऑक्टोंबर आर्यन खान प्रकरणापासून एनसीबीचा फर्जीवाडा सुरु आहे. दिल्लीत यासंबंधी लॉबिंग केली जात असून, त्यात राज्यातील भाजपचे नेते देखील सहभागी आहेत. पण मी मात्र सर्वांची पोलखोल करणार असे मलिक म्हणाले.
समीर वानेखेडेंनी संचालक राहावा यासाठी प्रयत्न
पुढे मलिक म्हणाले की, ''मागील काही दिवसांपासून समीर वानखेडे मी कार्यकाळ वाढवून मागत नाही. दोन महिन्यांच्या सुट्टीवर जाणार आहे. अशा बातम्या पेरल्या जात आहेत.'' कार्यकाळ संपल्यानंतरही अजूनही त्यांची बदली का करण्यात आली नाही? असा सवाल मंत्री नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. समीर वानखेडे हे एनसीबीचे झोनल संचालक राहावा यासाठी काहीजण विशेष प्रयत्न करत असल्याचे देखील मलिक म्हणाले.
समीर खान विरोधात कारवाई
एकट्या समीर खान विरोधात एनसीबीने कारवाई केली मात्र इतर जणांविरुद्ध एनसीबीने अपील का केले नाही? असा सवाल मलिकांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. मलिक यांचे जावई समीर खान यांचा जामिनाला एनसीबीने हायकोर्टात आव्हान दिले आहे. ड्रग्ज प्रकरणात समीर खान यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये अटक झाल्यानंतर 27 सप्टेंबरला त्यांना जामीन मंजूर झाला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली. परवा एनसीबीने हा जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अपील केली. एनसीबीच्या या भूमिकेवर नवाब मलिक यांनी टीका केली.
गीट हब आणि सॉली डील या अॅप्स महिलांची बदनामी
गीट हब आणि सॉली डील या अॅप्सद्वारे अल्पसंख्याक महिलांची बदनामी केली जात आहे. महिलांचे फोटो टाकत त्यात अश्लिल मजकुर लिहला जात आहे. त्यामुळे या अॅप्स पोर्टल चालवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. या पोर्टलवर मुलींचा लिलाव केला जातो. मी स्वत: गृहमंत्र्याकडे यासंबंधी तक्रार करणार असल्याचे मलिक म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.