आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनी लॉड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ झालीय. मुंबईतल्या जमीन हडपप्रकरणात मलिकांविरोधात कट रचल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे समोर आलेय. विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आपल्या जामीन निर्णयात ही निरीक्षण नोंदवलेय.
नवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने 30 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर मंगळवारी या निर्णयाचे पत्रक समोर आलेय.
कोर्टाचे निरीक्षण काय?
मलिकांच्या नियमित जामिनाबाबत 30 नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने जामीन फेटाळलाच. सोबतच विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी एक निरीक्षण नोंदवले. त्यात कुर्ल्यातली मुनिरा प्लंबर, त्याची आई मरिअम गोवावाला यांची जमीन हडप करण्यासाठी नवाब मलिकांसह हसीना पारकर, सलीम पटेल यांनी कट केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे असल्याचे म्हटले आहे.
कलमे योग्य लावली
पीएमएलए कायद्याच्या कलम 50 नुसार ईडीने साक्षीदारांचे जबाब, पुरावे गोळा केले. त्यात सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ताब्यात कुटुंबीयांच्या मालकीची कंपनी असल्याचे निष्पन्न होतेय. ही मालमत्ता घेण्यासाठी ईडीने पीएमएलए कायद्यातील लावलेली कलमे योग्य आहेत, असे निरीक्षणही नोंदवण्यात आले आहे.
असे आहे प्रकरण
'दाऊदच्या डी गँगमधील सदस्यांसोबत नवाब मलिक यांनी एकमत करून गोवावाला कंपाऊंड ही 3 एकर जमीन फक्त 55 लाखांत हडप केली. या जमिनीची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी आहे, अशा आरोपाखाली ईडीने मलिकांविरोधात पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ईडीने त्यांना 23 फेब्रुवारीला अटक केली. सध्या ते न्यायालयीन कोठडीत असून, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरुयत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.