आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाऊदशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरण:ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, पोटदुखीच्या तक्रारीनंतर जेजे रुग्णालयात दाखल

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाब मलिक यांचे हे छायाचित्र शुक्रवार दुपारचे आहे. त्यांना नियमित तपासणीसाठी ईडी कार्यालयातून बाहेर आणण्यात आले. - Divya Marathi
नवाब मलिक यांचे हे छायाचित्र शुक्रवार दुपारचे आहे. त्यांना नियमित तपासणीसाठी ईडी कार्यालयातून बाहेर आणण्यात आले.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आलेल्या आणि 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत असलेल्या नवाब मलिकांना पोटदुखीचा त्रास होत असल्याने मुंबईतील जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 62 वर्षीय मलिक यांना पोटदुखीमुळे रात्रभर झोप लागली नाही, त्यानंतर आज सकाळी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना दाखल करण्यात आले.

सध्या, ईडी किंवा रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

ईडीने 23 फेब्रुवारीला नवाब मलिकांना अटक केली होती. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या अटकेचा निषेध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून होत आहे. कुर्ला जमीन व्यवहारात नवाब मलिक तपास यंत्रणेला सहकार्य करत नसल्याचा आरोप आहे, त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली आहे.

नवाब मलिकांचा मुलगा आता ईडीच्या रडारवर
अटकेपासून ईडीच्या ताब्यात असलेल्या नवाब मलिकांच्या कुटुंबावरही ईडीने आपली पकड घट्ट करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडी आज नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना चौकशीसाठी समन्स बजावण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांनी दाऊदची बहीण हसिना पारकरकडून जमीन खरेदी केली होती. त्यावेळी फराज मलिकांचाही या व्यवहारात सहभाग होता.

मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात केंद्राविरोधात निदर्शने करत आहेत.
मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राज्यभरात केंद्राविरोधात निदर्शने करत आहेत.

हसीना पारकर यांना भेटायला गेला होता फराज मलिक
नवाब मलिक यांचे भाऊ अस्लम मलिक आणि फराज मलिक हे जमिनीच्या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी हसिना पारकर यांच्या घरी गेले होते. जमिनीचा सौदा 55 लाख रुपयांना झाला होता. फराज मलिक यांनी हसीना पारकर यांना 5 लाख आणि रोख 50 लाख रुपयांचा धनादेश दिला. त्यावेळी हसीना पारकरचा सहकारी सलीम पटेलही तिथे उपस्थित होता. त्यामुळे नवाब मलिक यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर ईडीचे पेच घट्ट होत असल्याचे बोलले जात आहे.

मलिक यांच्यावर हसिना पारकर यांच्याकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप
नवाब मलिकांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्याकडून कुर्ल्यातील गोवा कंपाऊंडची 3 एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. यासाठी त्यांनी केवळ 55 लाख रुपये दिले होते, ज्याची सध्याची किंमत सुमारे 300 कोटी आहे. या सगळ्यात आज प्राप्तिकर विभागाच्या पथकाने शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून त्यांच्यावर कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...