आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मलिक VS वानखेडे:सुनील पाटील ही व्यक्ती समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीची सदस्य, नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक नवाब मलिक यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका अद्यापही थांबलेली नाही. मलिक दररोज वानखेडेंवर आरोप करत आहेत. क्रूझ ड्रग्स प्रकरणाविषयी देखील ते नवनवीन खुलासे करत आहेत. आजही पत्रकार परिषद घेत नवाब मलिकांनी वानखेडेंवर आरोप केले आहेत. तसेच सुनील पाटील या व्यक्तीविषयी खुलासे केले आहेत.

याविषयी बोलताना नवाब मलिक म्हणाले की, 'मोहीत कंबोज यांनी नाव घेतलेली सुनील पाटील ही व्यक्ती समीर वानखेडे यांच्या प्रायव्हेट आर्मीची सदस्य आहेत. सुनील पाटील यांनीच आर्यन खानच्या अटकेची संपूर्ण योजना आखून तिची अंमलबजावणी करण्यात आल्याचा आरोप मोहीत कंबोज यांनी केला आहे. त्यावर मलिकांनी यांनी आज पत्रकार परिषद घेत पलटवार केला आहे. ते म्हणाले की, 'माझ्याकडे विजय पगारे हे देखील आले होते. त्यांनी लीला हॉटेलमधील काही गोष्टी मला सांगितल्या. मनीष भानुशाली, धवल भानुशाली, सॅम डिसुजा द ललित हॉटेलमध्ये तिथे मजा करत होते. वानखेडे यांना वाटले होते की, की ही गोष्ट उद्या समोर येणारच आहे तर कंबोजच्या माध्यमातून आधीच सांगून दिली पाहिजे. यामुळेच त्यांनी काल पत्रकार परिषद घेण्यात आली' असे नवाब मलिक म्हणाले आहे.

सुनील पाटलांविषयी केले खुलासे...
सुनील पाटील यांच्याविषयी नवाब मलिकांनी काही खुलासे केले आहेत. ते म्हणाले की, 'सुनील पाटील या व्यक्तीला मी आजपर्यंत कधीच भेटलेलो नाही. तो राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता नाही. सुनील पाटील याचे अमित शाहांसोबतचे व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. यासोबतच गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाच्या फोटोजमध्ये देखील तो आहे. यासोबतच मनीष भानुशालीचे देखील पंतप्रधानांसोबतचे देखील फोटो आहेत. तर सुनील पाटील हा फ्रॉड आहे. तो वानखेडेंच्या प्रायव्हेट आर्मीचा खेळाडू आहे. 6 तारखेला माझ्या पत्रकार परिषदेनंतर सुनील पाटीलचा फोन आला होता. मी तुम्हाला पत्रकार परिषदेसंदर्भात अधिकची माहिती देणार असल्याचे तो म्हणाला होता. दुसऱ्या पत्रकार परिषदेनंतर देखील त्यांनी फोन केला. मी त्याला मुंबईत येऊन पोलिसांना सर्व सांगण्यास सांगितले. तो येणार होता, मात्र आला नाही' असे मलिक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...