आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची प्रतिक्रिया:संसदेत जे घडले ते गुजरात मॉडेलची प्रतिकृती, महिला सदस्यांसोबत झालेली धक्काबुक्की ही अशोभनीय घटना; नवाब मलिकांचा केंद्रावर निशाणा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला. लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही.

संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने जी धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला ही घटना अशोभनीय आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संसदेचे कामकाज दोन दिवसाअगोदर स्थगित करण्यात आले. याचा अर्थ केंद्रसरकार जनतेच्या प्रश्नापासून पळ काढत होते. पेगॅसस प्रकरण, शेतीचा कायदा असेल, जातनिहाय जनगणना असेल या सर्व प्रश्नांवर चर्चा न करता किंवा त्याचे उत्तर न देता संसदेचे कामकाज स्थगित करण्यात आले. याचा अर्थ संसदेत कोणतेच उत्तर द्यायचे नाही असे धोरण सरकारचे होते असेही नवाब मलिक म्हणाले.

महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला. लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही. यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली परंतु त्यांनी सरळ- सरळ केंद्रसरकारला याप्रकरणी विचारणा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे असेही नवाब मलिक म्हणाले.

राज्यसभेत बुधवारी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार पाहायला मिळाला. यावरुन देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या वेळी विरोधी खासदार आंदोलन करत असल्याचे दिसून येत आहे आणि या दरम्यान त्यांना आवर घालण्यासाठी मार्शलला बोलावण्यात आले. खासदार आणि मार्शल यांच्यातील संघर्ष झाला. दरम्यान काही महिला खासदारांनाही धक्काबुक्की करण्यात आली.

गुजरात मॉडेलची प्रतिकृती

संसदेत जे घडले ते अलोकतांत्रिक गुजरात मॉडेलची प्रतिकृती होती असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे. गुजरातमधील भाजप सरकार विधानसभेत विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी बळाचा वापर करते आणि आता भाजपच्या नेतृत्वाखालील हे केंद्रसरकार संसदेतही तेच करत आहे असा प्रहारही नवाब मलिक यांनी केला आहे. दरम्यान #MurderOfDemocracy ('लोकशाहीची हत्या') हा हॅशटॅग वापरत नवाब मलिक यांनी ट्वीटवरुन केंद्रसरकारवर हल्लाबोल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...