आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Nawab Malik। Sameer Wankhede । Sameer Wankhede's School Certificate Presented By Nawab Malik After His Birth Certificate; Wankhede's Religion To Be Decided In Court

मलिक VS वानखेडे:जन्मदाखल्यानंतर नवाब मलिकांनी सादर केला समीर वानखेडेंचा शाळेचा दाखला; न्यायालयात होणार वानखेडेच्या धर्माचा फैसला

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत की हिंदू? यावर आज न्यायालयात फैसला होणार आहे. मात्र त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल केला आहे. या दाखल्यानुसार समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीने हा दाखला व्हायर केला असला तरी काही वेळातच वानखेडे हे मुस्लिम की हिंदू आहेत हे कोर्टाकडून स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सेंट पॉल आणि सेंट जोसेफ शाळेचे दोन दाखले व्हायरल केले आहेत. या दाखल्यात समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचे लिहिले आहे.

सेंट जोसेफ हायस्कूलचा हा दाखला 1989 चा आहे. त्यात समीर वानखेडे यांचा जन्म मुंबईतील दाखवण्यात आला आहे. तर सेंट पॉल हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला 27 जून 1986 चा आहे. त्यातही वानखेडे यांचा धर्म मुस्लिम आणि जन्म ठिकाण मुंबई दाखवण्यात आले आहे. त्यामुळे वानखेडे हे मुस्लिम असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेकडूनही कागदपत्रे सादर
मुंबई महापालिकेकडूनही वानखेडेंबाबतची कागदपत्रे मागवण्यात आली होती. वानखेडेंच्या कागदपत्रांमध्ये अनेक त्रुटी असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेने ही सर्व कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. समीर वानखेडे यांच्या सर्टिफिकेटमुळे त्यांच्याविरोधात निर्णय जाण्याची शक्यता आहे.

सूत्रांच्या मते तर वानखेडे हे जन्माने मुस्लिम असल्याचा पालिकेने निष्कर्ष काढला असून, ही कागदपत्रे कोर्टात सादर केली आहेत. मात्र, या वृत्ताला पालिकेने दुजोरा दिला नसला तरी पालिकेने कोर्टात कागदपत्रे सादर केल्याने कोर्टात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याप्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात उद्या इन चेंबर सुनावणी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

जन्म प्रमाणपत्र मीडियावर व्हायरल
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा शाळा सोडल्याचा दाखला आता सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. त्याला मात्र समीर वानखेडे यांनी स्पष्टपणे नकार देत, सोशल मीडियात व्हायरल होत असलेला जन्म दाखला खोटा आहे. या खोडसाळपणा विरोधात मी कोर्टात चॅलेंज करणार आहे असा इशारा देखील वानखेडे यांनी दिला होता.

त्यामुळे आज, गुरुवार सकाळपासून सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्याबाबत वानखेडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर समीर वानखेडे यांचे समीर दाऊद वानखेडे असे नाव असल्याचे पाहिला मिळत आहे. शिवाय यावर समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचे देखील निदर्शनास येत आहे.

एक दाखला सेंट जोसेफ हायस्कूल वडाळा, तर दुसरा सेंट पॉल हायस्कूल दादर या शाळांचा आहे. त्यामुळे या दोन्ही दाखल्यांबाबत आणि यावर उल्लेख असलेल्या धर्माबाबत एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे काय भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बोगस प्रमाणपत्र दाखवून नोकरी मिळवली
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी बोगस जातप्रमाणपत्र दाखवून शासकीय नोकरी मिळवली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. याविरोधात वानखेडेंचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी जातप्रमाणपत्रावरून नवाब मलिकांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे.

दुसरीकडे समीर वानखेडेंची पत्नी क्रांती रेडकरने समीर वानखेडेंच्या जन्माचा दाखला नुकताच सोशल मीडियात शेअर केला होता. कोर्टातील सुनावणी वेळी नवाब मलिकांनी बुधवारी कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामार्फत वानखेडेंचा शाळेचा दाखला आणि इतर काही कागदपत्र देण्यासाठी परवानगी मागितली आहे.

बातम्या आणखी आहेत...