आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाब मलिकांच्या मुलाच्या अडचणीत वाढ:खोट्या व्हिसाप्रकरणी फराज मलिकांविरोधात गुन्हा, मोहित कंबोज यांची टीका

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्या मुलाच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. लग्न केल्याचे भासवत फ्रेंच रहिवासी असलेल्या महिलेला व्हिसा काढण्यासाठीच्या प्रकरणी फराज मलिक यांच्यासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे ट्विट भाजपचे मोहीत कंबोज भारतीय यांनी केले आहे.

नेमके काय प्रकरण?

फराज नवाब मलिक यांची दुसरी पत्नी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या महिलेचे नाव लॉरा हॅमलिन असल्याचे समोर आले आहे. लॉराने ज्या फ्रेंच रहिवासी आहेत, भारतीय व्हिसासाठी त्यांनी कागदपत्रे दाखल केली होती, त्यासाठी त्यांनी फराज मलिकांसोबत लग्न झाल्याचे खोटी कागदपत्रे दाखल केली होती. मात्र याप्रकरणी चौकशी केली असता ते सर्व खोटे असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे काल रात्री खोटे लग्नाचे दाखले देत व्हिसा मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मलिकांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

कुर्ला पोलिस स्टेशनच्या मुंबई स्पेशल क्राईम ब्रॅंच 2 यांच्याकडे बनावट व्हिसासंदर्भात प्रकरणे येतात. त्यांच्या तक्रारीवर कुर्ला पोलिसांच्या छाननीमध्ये मलिक यांचे नाव आहे. त्यावर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​​​​​फराज नवाब मलिक यांच्या दुसऱ्या पत्नीच्या व्हिसासाठी बनावट कागदपत्रे वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी कुर्ला पोलिसांकडून नवाब मलिकांच्या मुलासह 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपचे मोहित कंबोज यांनी ट्विट करून नवाब मलिक यांना डिवचले आहे. 'मुंबई पोलिसांनी नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे, व्हिसा अर्जासाठी बनवलेल्या बनावट कागदपत्रांसाठी दुसरी पत्नी हॅमलीन जी फ्रेंच रहिवासी आहे! दुसऱ्यांना फर्जीवाडा म्हणणारे स्वःताच किती फर्जी आहेत, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...