आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वानखेडेंचे प्रत्युत्तर:मलिकांच्या महागड्या पेहरावावरील आरोपांवर समीर वानखेडेंचे प्रत्युत्तर, म्हणाले - 'ही फक्त अफवा आहे, त्यांनी खरी माहिती शोधून काढावी'

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई ड्रग्ज केस प्रकरणानंतर राज्यातील राजकीय वातावरण हे तापलेले दिसत आहेत. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप करत आहेत. नुकताच मलिकांनी समीर वानखेडेंच्या पेहरावावरुन त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. आता यावर समीर वानखेडेंनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच या केवळ अफवा असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

महागड्या पेहरावावरील आरोपांवर प्रत्युत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले की, माझ्या महागड्या कपड्यांची केवळ अफवा आहे, मलिकांना त्याविषयी कमी माहिती आहे. यामुळेच त्यांनी खरी माहिती शोधून काढायला हवी असे आव्हान समीर वानखेडेंनी दिले. ड्रग्जचा खेळ खेळून वानखेडे करोडो गोळा करतो. बाकी त्याचे अधिकारी बघा जे फक्त 700 ते 1000 रुपयांचा शर्ट घालतात, पण वानखेडे 70 हजारांचा शर्ट घालतात. वानखेडे रोज नवीन शर्ट बदलून येतात, त्यांनी पंतप्रधान मोदींनाही मागे टाकले आहे. असे नवाब मलिक म्हणाले होते.

जास्मिन वानखेडेंवरील आरोपांवरही वानखेडेंनी दिले उत्तर...
वानखेडेंकडून समीर वानखेडेंच्या बहिण जास्मिन वानखेडेंवरही आरोप करण्यात आले होते. या आरोपांचे खंडन करताना समीर वानखेडे म्हणाले की, 'सलमान नावाच्या ड्रग्ज पेडलरने माझ्या वकील बहिणीला खटला घेण्यासाठी अप्रोच केले होते. मात्र माझ्या बहिणीने हा खटला घेतला नाही. कारण ती एनडीपीएसच्या केस पाहत नाही. या पेडलरला माझ्या बहिणीने हाकलून लावले होते. बहिणीच्या मार्फत ट्रॅप करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मध्यस्थीच्या मार्फत आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला जातोय. या सर्वांमागे ड्रग्ज माफियांचा हात आहे. यासोबतच ज्या तस्कराच्या नावाने पत्र आले आहे त्याला मी स्वतः अटक केली आहे आणि तो अजुनही तुरुंगात आहे. त्याच्या whatsapp चॅट शेअर करत खोटे आरोप करण्यात येत आहेत.'

बातम्या आणखी आहेत...